Halloween party ideas 2015

*महाराष्ट्र पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.सुधिरकुमार ब्राम्हणे यांच्या मागासवर्गीय विकास मंडळ या संस्थेला भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राचा जिल्हा पुरस्कार जाहीर*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
         गेल्या 10 वर्षापासुन  सुधीरजी हे आपल्या मागासवर्गीय विकास मंडळाच्या माध्यमातुन नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत आहेत.संस्थेच्या माध्यमातून शासनाचा एक पैसाही न घेता सुधीरजींनी जिल्ह्यात तज्ञ डॉक्टरांना घेऊन अनेक मोतिबिंदु व नेत्र शिबिरे घेऊन आता पर्यंत सुमारे 3500  पेक्षा जास्त रुग्णांवर मोतीबिंदुची शस्त्रक्रिया करुन दृष्टिदानाचे महान कार्य केले आहे, शिबिरासाठी लागणारा प्रवासखर्च, मंडप, प्रचार,रुग्णांना चहा नाश्ता तसेच गरजेच्या वेळी शासकीय अथवा ट्रस्टच्या रुग्णालयां पर्यंत रुग्णांना  ने आण साठी लागणारा सर्वां खर्च ब्राम्हणे कुटुंबीयांनी स्वतःच्या खिशातुन केला आहे प्रसंगी मोठ्या दात्यांनी देखील काही शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे मदत करुन सुधीरजींना प्रोत्साहन दिले आहे.सुधीरजींनी तज्ञांच्या माध्यमातुन अनेक शिबिरांतुन सुमारे 22000 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी केली आहे.128 अंध लोकांना एकाच दिवशी एकाच ठिकाणी आणुन त्यांच्या वर पुणे, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमु मार्फत तपासणी करुन  8 अंधांना पुढील उपचारा साठी मुंबई येथे पाठवुन नवदृष्टि दिली आहे याच कार्यक्रमात 100 % 120 अंध बांधवांना जागेवर जिल्हा शल्य चिकित्सकां मार्फत मेडिकल सर्टिफिकीट देऊन त्याच ठिकाणी 120 लोकांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणेला प्रवृत्त करुन त्यांना अंधकाठीचे वाटप केले, सुधीरजींनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून 120 युवतींना सौन्दर्य प्रसाधन,कर्तन व शिवण चे प्रशिक्षण दिले आहे.नंदुरबार सारख्या जिल्ह्यात नेत्र दानाची चळवळ उभी केली आहे,केवळ चळवळ उभी करुन न थांबता अक्कलकुवा तालुक्यातुन  त्यांनी प्रथमच आपल्या वडिलांचे मरणोत्तर नेत्र दान करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संपुर्ण कुटुंबाने देखील मरणोत्तर नेत्र दानाचा संकल्प केलाय.
    सुधीरजींनी संस्थेच्या माध्यमातुन जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, गरजु विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, मोफत भव्य आरोग्य शिबीरे, नेत्र दान संकल्प मेळावे, नेत्र तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, महिला मेळावे, बालहक्क जनजागृती रॅली, रस्ता सुरक्षा,व्याख्याने ,विविध स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, व्यवसाय व स्वयंरोजगार मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पर्यावरण व स्वच्छतेचे कार्यक्रम,या सारख्या असंख्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सुधीरजींनी निस्वार्थ पणे उल्लेखनीय कार्य केले आहे. सुधीरजी आपल्या संस्थेचे कार्य सांभाळत आज दुसऱ्या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणुन कार्यरत आहेत ते या संस्थेच्या माध्यमातुन देह विक्रय करणाऱ्या महिला व समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांच्या न्याय हक्कासाठी स्तुत्य कार्य करत आहेत.
           त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्राने त्यांच्या संस्थेला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणुन पुरस्कार जाहीर केला आहे.25000 रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप असुन लवकरच एका कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.विशेष म्हणजे सुधीरजींच्या संस्थेचा प्रस्ताव राज्य पुरस्कारासाठी पाठविला गेला आहे.
     *वरील अनेक उल्लेखनीय कार्यासाठी सुधीरजींच्या संस्थेला जाहीर झालेल्या पुरस्कारासाठी सुधीरजींचे व त्यांच्या खांद्याला खांदा लावत संस्थेचे कार्य करणाऱ्या मोठ्या भगिनी पुष्पलता ब्राम्हणे-वाघ, व कुटुंबाचे मनापासुन अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा तसेच परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व राज्य कार्यकारणी सदस्य यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.