सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
अमळनेर प्रतिनिधी-सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 2 आँक्टोबर महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर यांनी केले तर संस्थेचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन केले. व्यासपिठावर विश्वस्त बापू नगांवकर,अँड उपासणी, पी.एन भादलीकर, प्रसाद जोशी दिपक वाल्हे,ईश्वर महाजन,सुमीत धाडकर, निलेश पाटील,भिमराव जाधव
होते.
महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढयातील योगदानाबद्दल विश्वस्त प्रकाश वाघ,बापू नगांवकर यांनी आपले विचार मांडले, तर वाचनालयाच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा दिला. तर अध्यक्षीय भाषणातून वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे म्हणाले कि वाचनालयाला दिडशे वर्षे पुर्ण होत आहेत .आज गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करतांना आनंद होत आहे.वाचनालयाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे सांगत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्वातंत्र्य लढयातील योगदान भावी पिढीला प्रेरणादायी आहे असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
फोटो
सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करतांना संस्थेचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष प्रा माधुरी भांडारकर, प्रकाश वाघ,बापु नगांवकर व सदस्य
छाया ईश्वर महाजन अमळनेर