Halloween party ideas 2015

दारू बंदी साठी २ ऑक्टोबर २०१८ रोजी भजन , पारंपारिक वाद्यांसह पंकज पाटील तालुका अध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष)  यांचे गावांतील असंख्य महिला ,पुरूषांसह दहिवद गावांत आमरण उपोषण .
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दहिवद ता.अमळनेर येथे  सरास  देशी –विदेशी दारू विकली जात आहे. त्यासाठी वेळोवेळी ग्रामसभेत ठराव करून पोलिस स्टेशन मध्ये दिलेले असतांना देखिल आजपावेतो अमळनेर पोलिस स्टेशन मार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही .परिणाम स्वरूप गावांत सरास हात भट्ट्या लावल्या जातात .देशी विदेशी  दारू सहज उपलब्ध होत असल्याने गावांतील राजकीय लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तरुणांना दारू पाजून गावांत भानगडी लावतात . ज्या तरुणांकडून शुद्धीवर मुंगी मारली जाणार नाही अश्या तरुणांना दारू पाजून जीवे ठार मारण्या इतपत  कृत्य करून घेतले जात आहे. संपुर्ण अमळनेर तालुक्यात अवैध दारू विक्री सरास चालू असून अवैद्य  दारू विक्री  बंद करण्यास अमळनेर पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे.दहिवद गावांतील राजकीय वरदहस्त ,मसलपावर व  आर्थिक सदृढ लोकांकडून गरीब व गरजू तरुणाना दिशाभूल व दिशाहीन केले जात आहे.
      परिणाम स्वरूप गावांत तणावाचे वातावरण निर्माण होवून दोन समाजांमध्ये तेढ  ,वैमनस्य निर्माण होत आहे. या सर्व  गावाची  कारणामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडत असून अमळनेर पोलिस स्टेशन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या अहिंसापर  मार्गावर जात पंकज उर्फ श्यामकांत पाटील हे  २ ऑक्टोबर २०१८ रोजी  गांधी जयंती  निमित्त मौजे दहिवद ता.अमळनेर जि.जळगांव येथे ग्रामपंचायत दहिवद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहे.आजतागायत त्यांनी अमळनेर तालुक्यात तहसिल कार्यालयासमोर ४ वेळा उपोषण केले आहे .त्यात पहिल्या वेळेस ७ दिवस ,दुसऱ्या वेळेस १३ दिवस ,तिसऱ्या वेळेस ३ दिवस व चौथ्या वेळेस १ दिवस असे उपोषण त्यांनी आजपर्यंत केलेले असून त्यांनी तालुक्यातील गैरकारभार करणाऱ्या आठ रेशन दुकानदारांचा रेशन परवाना रद्द केला आहे.
जोपर्यंत गावांत संपुर्ण व कायमस्वरूपी  दारूबंदी होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी एस.पी. जळगांव , जिल्हाधिकारी जळगांव , आयुक्त नाशिक, विशेष पोलिस निरीक्षक (नाशिक), सचिव मंत्रालय व मा.मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व आपले सरकार यांच्याकडे अमळनेर पोलिस स्टेशनची online तक्रार दाखल केली आहे .
चौकट

दहिवद गावातील दारू विकणाऱ्या वर ठोस कारवाई करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे समाजसेवक पकंज पाटील यांनी सांगितले.
अमळनेर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व सहकारी, व
आज उपोषणस्थळी चाळीसगांव येथील राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आले असता त्यांनी कारवाई करू असे आश्वासन दिले परंतु त्यात संदीग्धता असल्याने आम्ही आमच्या उपोषणाबाबत ठाम आहोत. जोपर्यंत दारू विकणाऱ्या नागरीकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे सांगितले.
पकंज पाटील
समाजसेवक, अध्यक्ष
प्रहार संघटना अमळनेर

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.