Halloween party ideas 2015


एकदिवसीय सामन्यात नव्वदीच्या दृष्टचक्रात अडकलेले अग्रणी फलंदाज
सामना कोणताही असो पण प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं ते शतक बनविणं. काही जण शतकाच्या जवळ जाऊनही किरकोळ धावांमुळे शतकापासून वंचित राहतात. " नर्व्हस नाईन्टीज " हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल. ९० ते ९९ च्या दरम्यान असताना शतक बनविण्यासाठी जी सकारात्मक मानसिकता लागते ती जो फलंदाज गमावतो त्या परिस्थितीला नर्व्हस नाईन्टीज म्हणतात. या परिस्थितीत फलंदाज कमालीचा गोंधळलेला असतो. शतक होईल का न होईल ? या द्विधा मन:स्थितीत तो आपले धैर्य गमावून बसतो व शतक न नोंदविता बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जातो.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात नर्व्हस नाईन्टीजचे शिकार ठरलेल्याा जगभरातील पहिल्या पाच फलंदाजांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
कसोटी व वनडेमध्ये सर्वाधीक धावा व शतकांचा विश्वविक्रम रचनारा, शतकांचे महााशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरलेला ग्रेट इंडियन सचिन तेंडूलकरच्याच नावे नर्व्हस नाईन्टीजचा शिकार होण्याचा दुर्भाग्यपूर्ण विश्वविक्रमही आहे.
आपल्या २३ वर्षांच्या प्रदिर्घ अशा वनडे कारकिर्दीत सचिन सर्वाधिक ४६३ सामने खेळला. त्यात सर्वाधिक ४९ शतकेही लगावली, मात्र ९० - ९९ च्या दरम्यान सर्वाधिक १८ वेळा बाद होण्यात तोच अव्वल राहीला.
नव्वदीच्या दृष्ट फेऱ्यात अडकणारा दुसरा फलंदाज आहे झिंबाब्वेचा अष्टपैलू खेळाडू ग्रँट फ्लॉवर. सन १९९२ - २०१० या १८ वर्षांच्या कारकिर्दीत ग्रँट २१४ सामने खेळला. सहा शतकांसह ६५७१ धावा बनविल्याा मात्र ९० ते ९९ दरम्यान तब्बल ९ वेळा बाद झाला.
न्यूझिलंडचा माजी सलामीवीर नाथन अॅस्टलही या दुर्देवी खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकाने सामील झालाा.नाथने एकूण २१७ एकदिवसीय सामने खेळताना ३४.९२ च्या सरासरीने १६ शतकांसह ७०९० धावा बनविल्या. एकंदर ९ वेळा तो नर्व्हस नाईन्टीजचा शिकार बनला.
या दुर्देवी खेळाडूंच्या कळपातील चौथा बळी ठरला श्रीलंकेचा माजी कर्ग्णधा अरविंदा डिसिल्व्हा. अरविंदाने ३०८ सामने खेळताना २९६ डावांत ११ शतकांसह ९२८४ धावा फटकविल्या. परंतु ग्रँट फ्लॉवर व नाथन अॅस्टल यांच्या प्रमाणे तोही ९० ते ९९ च्या दरम्यान ९ वेळा शतकापासून दूर राहीला.
क्रिकेट इतिहासातील सर्वात्तम अष्टपैलू खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आपल्या वनडे कारकिर्दीत ३२८ सामने खेळला. त्यातील ३१४ डावात १७ शतके ठोकले. मात्र तोही ८ वेळा ९० ते ९९ दरम्यान बाद झाला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.