Halloween party ideas 2015


सुरक्षित पद्धतीने मुल शिकण्याची हमी देण्याचे शिक्षण पद्धती पुढे आव्हान.
सर्व क्षेत्रात सर्वांनी अपडेट राहणे काळाची गरज.
लेख
(लॉक डाऊन नंतरचे शिक्षण याविषयी राज्यातील शिक्षण विभाग संघटनाचे राज्य समन्वयक तथा राज्य शासन राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक विविध संघटनांचे प्रतिनिधित्त्व करणारे शिक्षण क्षेत्रातील चिकित्सक व प्रतिथयश अभ्यासक सबंध राज्याला सुपरिचित असलेले किशोर पाटील कुंझरकर यांचे विविध संकल्पना स्पष्ट करणारा लेख खास वाचकांसाठी)

आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेत यावे असे प्रत्येक शिक्षकाला मनापासून वाटत असते आजही covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वकाही सुरळीत होऊन शाळा सुरळीत व्हाव्यात असे राज्यातील देशातील सर्व शिक्षकांना प्रामाणिकपणे वाटते परंतु असं म्हणतात शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्. आजही कोरोणाचा वाढता प्रसार आपल्या जगण्या समोर शिकण्या समोर मोठ आव्हान घेऊन उभा आहे.
कोरोना covid-19 पार्श्वभूमीवर लॉक डाऊन नंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येक पालकांच्या मनात शाळा विषयी व शिक्षणाविषयी अनामिक भीती घर करू पाहत आहे ही भीती म्हणजे वर्गात सर्वसाधारणपणे नेहमीप्रमाणे देखील एखादा विद्यार्थी शिंकला किंवा त्या विद्यार्थ्यास खोकला आला तरीदेखील कदाचित प्रश्न उपस्थित होणार आहेत हे चित्र बदलण्यासाठी दूर करण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रणे बरोबर माझा शिक्षक सक्षमपणे उभा राहिल व यावर मात करेल आणि शिक्षण शाळा व जीवन सुंदर करण्यासाठी पुढाकार घेऊन सर्व परिस्थितीवर संकटावर केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने मात करून यात तिळमात्र शंका नाही.शैक्षणिक वर्ष 2020/21 च्या सुरुवातीलाच शिक्षण पद्धती पुढे अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान असून त्यात आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पद्धतीने मुल शिकण्याची पालकांना हमी आणि संपूर्ण विश्वास देण्याचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
प्रत्येक वर्गाला टीव्ही वाहिनी द्वारे शिक्षण देण्याची योजना जरी आखली गेली असली तरी प्रत्यक्षात आपल्या राज्यात आपल्या देशात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील वीज सुरळीत नाही,राज्यातील केवळ 27 टक्के पालकांच्या मोबाईलवरच इंटरनेट सेवा आहे, दीक्षा ॲप्स चा वापर अजूनही आपण तळागाळात तांत्रिक अडचणीमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही या सर्व पार्श्वभूमीवर covid-19 ची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किती वेळ लागेल याचा नेमका अंदाज आजच्या तारखेत बांधता येत नाही या परिस्थितीत विद्यार्थ्यांना अपेक्षित वर्गनिहाय अध्ययन पातळी गाठली जाणे ही अपेक्षा ठेवणे पेक्षा संकल्पना व कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे क्रमप्राप्त ठरणार आहे . शाळा-शाळांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांचा दालन खुले करणे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे.असे ग्रामीण भागात कार्य करणारा वाडी-वस्तीवरील शिक्षक या नात्याने मला वाटते.फिजिकल डिस्टन्ससिंग साठी सुरुवातीच्या टप्प्यात दोन सत्रात शाळा भरवणे क्रमप्राप्त ठरणार आहे जोडीने डिजिटल होम स्कूलिंग चे महत्त्व देखील काळाची नितांत गरज म्हणून गरजेपुरता का असेना काही काळापुरते का असेना आपल्याला स्वीकारावे लागणार आहे . ऑनलाइन शिक्षण स्टडी फ्रॉम होम हा शाळा आणि शिक्षणाला कधीच पर्याय ठरू शकणार नाही हेही आपण विसरता कामा नये. मात्र लॉक डाऊन नंतरच शिक्षण
देण्यासाठी आणि covid-19 चा प्रसार थांबला नाही तर शिक्षण पद्धतीत काही आमूलाग्र बदल आवश्यक असून इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा उपयोग करून टीव्हीला स्क्रिन जोडून प्रामुख्याने काही तंत्रस्नेही शिक्षकांनी केलेल्या प्रयोगाकडे लक्ष वेधून ''घरघर पाठशाला" या नव्या प्रणालीचा प्रामुख्याने विचार करावाच लागणार आहे तसेच वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे वर्ग भरवणे त्याच जोडीने प्रकल्प पद्धतीचा देखील नियोजनपूर्वक वापर करणे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःहून शिकावे कसे हा दृष्टिकोन त्यांच्यात रुजविणे शिक्षकांना आवश्यक ठरणार असून अशा पद्धतीने स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहेअसे मला वाटते. परिस्थिती अधिकच बिकट झाली तर पीबीई पद्धतीचा वापर देखील सहाय्यकारी होणार आहे. (पीबीई म्हणजे पॉईंट ,बॅच अंड एक्सपिरीयन्स अवर्स)रुग्ण संख्या दर झपाट्याने वाढतच राहिली तरी हेदेखील आपल्याला स्वीकारावे लागणार आहे.आपल्या राज्यात काल तर 2974 रुग्न आढळून आले. देशातील डॉक्टर्स नर्सेस पोलिस यंत्रणा समाजसेवी घटक तसेच शिक्षक कोरोना योद्धा बनले असून सातत्याने रुग्ण सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊन जिवाची बाजी न करता सेवारत आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले आहे. सर्व जग देश आणि
राज्य भर सुरू


संघर्ष कडे पाहून सर्व जनतेने सर्वांनी सुरक्षित राहणे व स्वच्छतेचे व आरोग्याच्या सवयींचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक असून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे समाजव्यवस्थेतील सर्व घटकांनी जर तंतोतंत पालन केले तर आपण निश्चितच covid 19 वर मात करू शकणार आहोत.शाळा तेथे हँडवॉश स्टेशन अनिवार्य बाब ठरणार असून सर्वप्रथम शाळा सुरू झाल्या बरोबर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळा तेथे हँडवॉश स्टेशन शाळा तेथे सनीटायझर्स ,शाळा तेथे सुरक्षा किट, विद्यार्थिसंख्या निहाय मास्क, बूस्टर डोस तसेच होमिओपॅथिक,विटामिन गोळ्या पुरवणे तसेच बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे राज्यशासन व्यवस्थेपुढे आव्हान ठरणार आहे. सर्वसाधारणपणे एक मे रोजी निकाल जाहीर जाहीर करून दोन मे पासून 15 जून पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असायचा या अगोदर कधीच या उन्हाळी सुट्टी कालावधीत राज्यातील शिक्षकांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रसंग माझ्या साधारण वीस वर्षाच्या शिक्षक सेवाकाळात आला नाही.
मात्र सन२०२० मध्ये कोरोना ने सर्व जगालाच बदल घडवायचे शिकवलेले दिसते आपण राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पाहतोय की चक्क मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखील ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग सुरू असून विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम द्वारे राज्य शासनाच्या व महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राप्त दैनंदिन अभ्यासिका अभ्यास माले द्वारे शिकविले जात आहे. लॉक डाऊन कालावधीत सुट्टी असतानाच सर्वांनाच प्रश्न पडलेला दिसत आहे की राज्यातील ग्रामीण भागातील व इतर तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा कधी व कशा भरवायची?
मला वाटतं याच तंतोतंत उत्तर आज तरी आपल्याजवळ कोणा जवळचं नाही परंतु आपले मायबाप शासन त्याच जोडीने प्रशासन,पालक,शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाजव्यवस्थेची याबाबतीत शिक्षणाची गाडी रुळावर आणण्यासाठी सु समन्वयाची भूमिका खुप खुप महत्त्वाची ठरणार आहे हे निश्चित.
आरोग्य व स्वच्छतेला विशेष महत्त्व देणे यासंदर्भात ची सवय आता गाव खेड वाडी वस्तीपासून सर्वांनाच सर्वत्र लावून घ्यावी लागणार आहे. स्वच्छतागृह स्वयंपाकगृह अधिक स्वच्छ ठेवणे वेळच्यावेळी शाळा स्वच्छतागृह स्वयंपाकगृह निर्जंतुकीकरण करणे याच जोडीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे नितांत गरजेचे राहणार आहे.आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या प्रेरणेतून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संचालक डॉक्टर दिनकर पाटील आयटी विभाग , संशोधन विभाग,द्वारा राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा सक्षमीकरण व प्रशासन शाखेतील अधिकारी कर्मचारी यांचे साठी व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरातून व 0 रूपये खर्चातून ऑनलाईन प्रशिक्षणाचा उपक्रम प्रशिक्षण परिषदेने हाती घेतला असून ग्रामीण भागात 63 टक्के पेक्षा जास्त पालकांकडे टीव्ही आहेत बालचित्रवाणी ला पूर्वीचे दिवस आणणे गरजेचे आहे.
राज्यातील सर्व पूर्व शिक्षण संचालकांच्या अनुभवाचा देखील फायदा घेणे गरजेचे आहे राज्य शासनाने शालेय शिक्षण विभागाने थिंक टॅंक मध्ये राज्यातील प्रयोगशील शिक्षक संघटना आणि माजी शिक्षण विभागाचे संचालक यांना सामावून घ्यायला हवे. राज्यातील वाडी वस्ती तांडा शहरी व ग्रामीण शिक्षकांच्या नवनवीन प्रयोगांचे देवाण-घेवाण शिक्षण समृद्ध करण्यासाठी बळकटीकरणासाठी आता सर्वांनी पुढे येणे वर्तमान काळाची गरज आहे. यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यात कार्यरत असणाऱ्या सर्वच शिक्षक हा माझ्यामते नाविन्याची कास धरणारा आहे.शिक्षक सक्षमीकरणासाठी देखील या सर्व बाबींचा समतोल साधला जाणे अपेक्षित आहे. खरं म्हणजे शिक्षण विभाग म्हणजे समस्या व प्रश्न सतत असणारा विभाग समजला जातो परंतु आजच्या या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक शिक्षक संघटनांकडून प्राप्त प्रश्नांचा आढावा घेऊन सर्व राज्य स्तर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्या चा देखील अभिनव प्रयोग शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभागाने आणि राज्य शासनाने मिशन मोड वर राबवावा असे माझ्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य पदाधिकारी मनाला वाटत. त्याच जोडीने कोरोना योद्धा सर्वांना सरसकट 40 लाखाचा विमा जाहीर करावा. राज्य शासन तसेच शिक्षकांच्या विविध संघटनांपुढे देखील यासाठी काम करण्याची मोठी संधी आहे.शाळा बंद पण शिक्षण सुरू हे चित्र उज्ज्वल सक्षम भावी पिढीचे निर्माणासाठी खचितच क्लेशदायक आहे . कारण राज्यातील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकावे असेच वाटते आणि प्रत्येक शिक्षकाला शाळेत जाऊन शिकवावे असे वाटते प्रत्येकाची त्या शाळेविषयी एक माते समान नाळ आणि निष्ठा जोडलेली आहे. परंतु आता राज्यावर नव्हे तर संपूर्ण जगावर आलेल्या महाभयंकर अशा covid 19 कोरोना संकटाची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही .कमीत कमी पुढील दोन वर्षे तरी याचे परिणाम जगातील देशातील व राज्यातील प्रत्येक क्षेत्रात उद्योग ,आरोग्य ,शेती असेल सहकार असेल शेती आदि सर्व क्षेत्रात दिसून येणार आहेत यात आपलं शिक्षणक्षेत्र देखील अपवाद ठरू शकणार नाही ही मानसिकता सर्वांनी तयार करणे गरजेचे आहे व जागतिक शिक्षणव्यवस्था आणि आपली भारतीय पारंपारिक शिक्षण पद्धती याबाबतीत संपूर्ण तुलना करून तसेच राज्यात गेल्या काही दशकात प्रामुख्याने शालेय शिक्षण क्षेत्रात राबवले गेलेले प्रयोग व त्याची रुजलेली मुळे याबाबत संपूर्ण चिकित्सा शिक्षण व्यवस्थेने करण्याची आणि भविष्यात दीर्घकाळासाठी कुठलातरी एकच धोरण निश्चित करण्याची व जगाच्या स्पर्धेत भारताला महासत्ता बनविण्यासाठी सक्षम शिक्षणव्यवस्था घडविण्याची हीच योग्य वेळ आहे असे माझ्यातील शिक्षकाला वाटते. लोक डॉन काळात सध्या फेसबुक व्हाट्सअप सोशल मीडियावर अनेक जण भरपूर वेळ असल्याकारणाने वेगवेगळ्या विषयावर आपली मते मांडत आहेत.अनेक शिक्षकांचे समुह सकारात्मक दिशेने संवाद घडवून आणत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे. ई साहित्य , ई शिक्षण ई साप्ताहिक ई-शिक्षण पत्रिका ही संकल्पना मूळ धरू पाहत आहे. डिजिटल क्रांती सर्व क्षेत्रात हातात हात घालून पुढे येत आहे.
पुढील काही दिवसांत कोरोणा महामारी संपेल असे आज तरी माझ्यासारख्याला वाटत नाही. यामुळे सर्वांनी केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे शिस्तीत राहणे अत्यावश्यक असून सर्व क्षेत्रात सर्वांनी सर्वांना अपडेट करणे आणि अपडेट राहणे जगण्यासाठी, शिकण्यासाठी व टिकण्यासाठी गरजेचं आहे.
शालेय शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्याचे शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी यांनी सुरुवातीच्या काळात ऑनलाईन पद्धतीने शाळा नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होतील असे संकेत दिलेले आहेत. अद्याप अधिकृत घोषणा शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री किंवा राज्य शासनाने केलेली नाही. येत्या काही दिवसात 10 जून पर्यंत अधिकृत पत्र येईलच त्यात नियम शर्ती व अटी राहतीलच वर्ग अंतर्गत बैठक व्यवस्था यापासून तर अनेक प्रश्न आपल्यापुढे उभी राहणार असून गोंधळून न जाता त्या प्रश्नांना सामोरे जाणे आपल्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे.
अभ्यासक्रम हा आपल्याला पूर्ण करावाच लागणार असून संबोध, संकल्पना स्पष्ट करण्याकडे कल देणे महत्त्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात संतुलित आहार , व्यायाम,संयम ,मनशांती याचा विचार करून आपली जगण्याची व शिक्षणाची पद्धती बदलणार हे आपण स्वीकारले पाहिजे. गावागावातील शिक्षण प्रेमींचे मदत देऊन त्यांच्यामार्फत देखील पालकांची मानसिकता निर्माण करणे साठी उद्बोधन करणे तसेच गावातील सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी राज्यातील परिस्थिती बघता मुलांना शाळेकडे वळते करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
मित्रांनो 14 सप्टेंबर 2000 ते आज पर्यंतचा म्हणजे वीस वर्षाचा माझा शिक्षक म्हणून अनुभव प्रवास आहे या कालावधीत बरच काही पाहता आलं बघता आलं अनुभवता आलं शिकता आलं. कदाचित आपण बरेचजण माझ्यापेक्षा अनुभवाने समृद्ध आहात परंतु माझ्यासारख्या शिक्षक कार्यकर्त्याला असे वाटते की ऑनलाईन सह जगणे व शिकणे आता काही काळापुरतं तरी आपल्याला स्वीकाराव लागणार आहे. लिबरल एज्युकेशन आणि सेल्फ मोटिवेशन सर्वांनी समजून घेऊन आत्मसात करणे गरजेचे आहे.व्यवस्थेने धोरणकर्त्यांनी लोकल गरजा आपल्या स्थानिक गरजा ओळखून कौशल्य विकास देणारे कृतीयुक्त शिक्षण आणि शिक्षक व शाळा या राज्यात या देशात सक्षम व प्रभावीपणे उभ करणे काळाची गरज आहे.
(लेखक बदलत्या शिक्षण सहकार राजकीय प्रवाहाचे चिकित्सक अभ्यासक आहेत.)
लेखक
किशोर रमेश पाटील कुंझरकर
राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समिती. राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ.
जिल्हा परिषद तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक .
जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन जळगाव जिल्हा.
उपसंपादक साप्ताहिक शिक्षक ध्येय जळगाव जिल्हा.
सदस्य एटीएम परिवार महाराष्ट्र.
सहसचिव औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल.
सल्लागार पत्रकार संघ जळगाव जिल्हा.
तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ एरंडोल.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव.
तज्ञ मार्गदर्शक राज्यस्तर व जिल्हास्तर तालुकास्तर प्रशिक्षण शिक्षण विभाग.
टॅग को कॉर्डिनेटर तेजस प्रकल्प महाराष्ट्रशासन टाटा ट्रस्ट ब्रिटिश कौन्सिल.
जिल्हा परिषद शाळा टिकवा अभियान.
बेटी बचाव बेटी पढाव अभियान.
7030887190.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.