Halloween party ideas 2015


*आघाडी शासनाच्या विरोधात अमळनेर भाजपाचे "महाराष्ट्र बचाव " आंदोलन*


अमळनेर-राज्यातील वाढती कोरोना बाधित रुग्णाची संख्या रोखन्यात राज्यातील आघाडी सरकारला आलेले अपयश यामुळे अमळनेर भारतीय जनता पार्टी तर्फे तालुक्यात ग्रामीण भागात १०४ व शहरी भागात ४९ बूथवर मा. आ.स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बचाव आंदोलन राज्य शासनाच्या विरोधात करण्यात आले.यावेळी आंदोलन कर्त्यानी काळा मास्क व हातात फलक घेवून राज्य शासनाचा निषेध नोंदविला.


राज्यात गेल्या आठवड्यापासून दररोज सरासरी १००० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत राज्य देशात क्रमांक १ वर असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात शासनाला मोठे अपयश आले आहे.लॉकडॉउन कालावधीत शेतकरी,शेतमजूर, बारा बलुतेदार,रिक्षा चालक,टैक्सी चालक,छोटे दुकानदार तसेच समाजातील इतर दुर्लक्षित वर्गाची बिकट आर्थिक स्थिति निर्माण झाली असून त्यांच्या करीता ५०,००० कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज ची घोषणा करण्यात यांवी अशी मागणी आंदोलन कर्त्यानी केली.


यावेळी मा. आ.स्मिता वाघ यांच्या समवेत ललिता पाटिल,जिल्हा चिटनीस महेश पाटिल,माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही. आर.पाटील, कृ उ बा सभापती प्रफुल्ल पवार,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,बाजार समिति संचालक पराग पाटिल,विजय राजपूत,राकेश पाटिल,महेंद्र महाजन,अमोल माळी, निखिल पाटिल,चंद्रकांत कंखरे,योगिराज चव्हाण,समाधान पाटिल,आदि उपस्थित होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.