स्व सौ पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न झाली.यात अष्टविनायकांतिल ओझर,लेण्याद्री ,मोरगाव, थेऊर गणेश दर्शन, भिमाशंकर ज्योतिर्लिंग,छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ला, श्री क्षेत्र आळंदी ,देहू, प्रतिबालाजी , नारायणपूर दत्तसंस्थान,पुणेदर्शन ,जेजुरी,शिर्डी इ प्रेक्षणीय, निसर्गरम्य, धार्मिक,व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणांचे महत्व जाणून घेतले.शिक्षकांनी भेट दिलेल्या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.दैनंदिन अध्यापनाबरोबरच प्रत्यक्ष भेटीतून व निसर्ग पर्यटनाच्या सान्निध्यातून मिळालेला मनमुराद आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भरभरून दिसत होता.
मुख्याध्यापक श्री पी.एस. विंचूरकर यांच्या मार्गदर्शनात सहल प्रमुख श्री प्रकाश पाटिल, श्री प्रदिप चौधरी सर यांनी नियोजन केले. श्री गोकुळ बोरसे, श्री सागर महाजन, श्री राहुल पाटील, सौ किर्ती सोनार,सौ स्वाती पाटिल, सौ वंदना पाटिल ,श्री दिपक बागुल, श्री राहुल पाटिल यांनी सहभाग घेतला. सहल यशस्वीपणे संपन्न झाली .