*बहुजन वंचित आघाडीच्या महाराष्ट्र बंदला माणगांवकरांनी दिलेल्या शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सर्वांचे मनःपूर्वक आभार : सागर भालेराव*
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) वंचित बहुजन आघाडी चे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी महाराष्ट्र बंद ची तमाम जनतेला हाक दिली होती या बंद च्या हाकेला संपूर्ण महाराष्ट्र व रायगड जिल्ह्यासह पूर्ण माणगांव तालुक्यातील सर्व संविधान प्रिय जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या बद्दल वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्रातील सर्व संविधान प्रिय मायबाप जनता, तसेच विषेशतः रायगड जिल्ह्यातील जनता त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे तरुण तडफदार आणि धडाडीचे रायगड जिल्हा युवा नेते सागर भालेराव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी
माणगांव तालुक्यातील तमाम जनतेला, माणगांव व्यापारी संघटना, माणगांव तालुक्यातील माणगांव शहर, निजामपूर विभाग, मोर्बा विभाग, गोरेगांव विभाग, इंदापूर विभाग, साई विभाग आणि खरवली विभाग इत्यादी सर्व विभागातील छोटे मोठे दुकानदार, रिक्षा चालक मालक संघटना यांनी या बंदला जाहिरपणे समर्थन देण्यासाठी आणि संविधान विरोधी एन आर सी, एन पी आर आणि सीएए कायद्याला जाहीर विरोध करण्यासाठी आपापली दुकाने आणि गाड्या एक दिवस बंद ठेवून माणगांव तालुक्यात शंभर टक्के कडकडीत बंद पाळला. त्याच बरोबर सदर बंदला माणगांव तालुक्यातील प्रशासकीय विभाग आणि पोलीस यंत्रणा यांना महाराष्ट्र बंद संदर्भात दिलेल्या निवेदनाला या सर्वांनी दिलेल्या शंभर टक्के उत्स्फूर्त बंद च्या सहकार्यामुळे या सर्व ज्ञात अज्ञात बंद पाळणार्यांचे वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा युवा नेते सागर भालेराव यांच्या कडून मनःपूर्वक आभार.
सदर महाराष्ट्र बंदला सर्व मुख्य बाजार पेठा आणि सर्व रिक्षा चालक मालक संघटना यांनी पूर्णपणे पाठिंबा देत वंचितच्या महाराष्ट्र बंद ला सहकार्य केले. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साथ दिली. या बद्दल रायगड जिल्ह्यातील सर्व संघटनांचे रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा युवा नेते सागर भालेराव यांनी आभार व्यक्त केले. आणि सदर बंद मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, रायगड जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ सोनावणे, माणगांव तालुका अध्यक्ष किरण मोरे, महेंद्र जाधव, देविदास जाधव, माजी तालुका अध्यक्ष शरद पवार, संजय घाग, विजय जाधव, सपना कांबळे, सुधीर जाधव, राहुल कांबळे, राहुल जाधव, रोहन जाधव, रामदास सावंत, राज जाधव, आकाश गायकवाड, दिलीप आंबेतकर, नंदू पवार, आर डी माने, वैभव कासे, संदीप जाधव, नागेश येलवे, मंदार मोरे, सौरभ कासे, नंदू पवार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली त्या बद्दल या सर्वांचे जाहिरपणे आभार व्यक्त केले आहेत.