Halloween party ideas 2015


संविधान विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद - वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांची हाक !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) शुक्रवार दिनांक 24/01/2020 रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने NRC,CAA,NPR या संविधान विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद चे जाहीर आवाहन केले आहे.
मोदी सरकार त्यांची आर्थिक दिवाळखोरी लपवण्यासाठी आणि परकिय मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी ज्या हिटलर गिरीचा उपयोग करून देशात संविधान विरोधी कायद्यांच्या माध्यमातून जी अस्थिरता निर्माण करत आहेत या सर्वाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधानिक मार्गाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला संपूर्ण महाराष्ट्रात सफल करण्या करीता श्रद्धेय बाळासाहेबांनी सर्व संघटना पक्षाना बंद मध्ये सामील होण्याचे आव्हान केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच समविचारी संघटनांचा या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी आपल्या रायगड जिल्हयात देखील सर्वत्र बंद ला अत्यावश्यक बाबी वगळता जिल्ह्यातील सर्व नागरिक, दुकानदार, व्यापारी संघटना, रिक्षा चालक मालक संघटना इत्यादींनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सागर भालेराव वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा युवा नेता याच्या वतीने करण्यात आले असून माणगांव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंद संबंधिची पुर्व कल्पना सूचक लेखी निवेदन माणगांव प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर मॅडम, माणगांव तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम, माणगांव पोलीस स्टेशन, माणगांव व्यापारी संघटना आणि रिक्षा चालक मालक संघटना इत्यादींना देण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले संविधानिक अधिकार संपुष्टात आणणार्या उपरोक्त कायद्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.