बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून नावा प्रमाणे नेहमीच अग्रेसर असलेल्या
बहुजन हितकारिणी सभेच्या सन २०२० च्या दिनदर्शिका तथा कॅलेंडर चा प्रकाशन सोहळा आणि वितरण कार्यक्रम गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ११: ३० वाजता माणगांव निजामपूर रोड वरील बहुजन हितकारिणी सभेच्या माणगांव कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तीमत्व बहुजन हितकारिणी सभेचे आधारवड माजी सैनिक श्री. चंद्रकांत उभारे यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर सोहळा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष मा. रविंद्र जाधव साहेब, तसेच सदर संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष मा. किशोर शिर्के, जिल्हा अध्यक्ष रमेश दगडू माने, जिल्हा सचिव योगेंद्र साळवी, कार्याध्यक्ष भिमराव मोरे , तालुका कार्याध्यक्ष संतोष मोरे, तालुका अध्यक्ष बाजीराव गायकवाड, सचिव सुधीर साळवी, सहसचिव बाबुराव कांबळे, कार्यालय प्रमुख जयरामजी जाधव, संघटक किशोर पवार, जनार्दन सावंत, उपाध्यक्ष अजय राजभर इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बहुजन हितकारिणी सभेच्या माध्यमातून वर्षभर अनेकविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. आजवर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब गरजूंना ब्लैंकेट वाटप कार्यक्रम, सावित्रीबाई दत्तक पालक योजना, महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे, बौद्ध पौर्णिमा, स्वच्छता अभियान, सामाजिक आणि धार्मिक संस्कार शिबीर राबविणे, बुद्ध आणि त्यांच्या धम्म या धम्म ग्रंथाचे मोफत वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि समाजातील गोरगरीब , निराधार, अपंग, विधवा आणि जेष्ठ नागरिक यांना सर्वोतोपरी मदत आणि शासनाच्या विविध योजनांचा मिळवून देण्यासाठी बहुजन हितकारिणी सभा नेहमीच प्रयत्नशील असते.
बहुजन हितकारिणी सभेच्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या सदर दिनदर्शिकेचे जिल्ह्यातील सर्व सभासद व पदाधिकारी आणि सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयात मोफत वाटप करण्यात येणार आहे.