दगडी दरवाज्यावरची मांगीर बाबांची प्रतिकृती सुरक्षित जतन करावी-बहुजन रयत परिषदेची मागणी
अमळनेर(प्रतिनिधी)
प्राचीन व इतिहास कालीन दगडी दरवाजा पाडल्यास तेथे असणारे मातंग समाजाचे दैवत मांगीर बाबा यांची प्रतिकृती पडून समाजाच्या भावाना दुखावल्या जातील,त्यामुळे सदरच्या दगडी प्रतिकृतीचे नवीन जागेत स्थलांतर करावे अशी मागणीचे निवेदन नगराध्यक्ष सौ.पुष्पलता पाटील,आणि अमलनेरचे प्रांत याना बहुजन रयत परिषदेकडून निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या दगडी दरवाजाचा काही भाग पाडून टाकावा असा पहिला पर्याय सुचवण्यात आला असून या दगडी दरवाजाचे स्थलांतर करावे असा दुसरा पर्याय असून तेथे उड्डाण पूल तयार करावा असा तिसरा पर्याय काढण्याचे विचाराधीन असल्याचे समजते.परंतु जर पहिला पर्याय निवडला गेला तर हा दगडी दरवाजा बांधताना त्यावर मांगीर बाबांची प्रतिकृती प्राचीन काळापासूनच उभारण्यात आली होती त्यामुळे सदरचा दगडी दरवाजा अनेकांचे श्रद्धास्थान आहे.जर या दारवाजाचा पुढचा भाग काढला तर वाहतूक सुरळीत होईल पण प्रतिकृतीला हानी पोहचेल.जर सदर प्रतिकृती पडली तर पुन्हा तशीच प्रतिकृती तयार करण्यात यावी,तसेच दगडी दरवाजा स्थलांतर केले तर त्याठिकाणी मांगीर बाबा यांची प्रतिकृती सध्या जशी आहे तशीच तेथेही त्यावर उभारावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आहे.त्यानुसार आज बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी न.प.चे नगराध्यक्षा सौ.पुष्पालता पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील,प्रांताधिकारी सीमा अहिरे याना लेखी निवेदन देण्यात आले.