कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे अमळनेर तालुक्यामध्ये घोषीत करण्यात आलेल्या *कन्टेनमेंट झोनमधील* व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी शासनामार्फत पुरविणेत आलेले *अर्सेनिक अल्बम ३०* हे औषध *दि.२२ मे २०२०* रोजी सकाळी *साळी वाडा,दुरदर्शन केंद्र,प्रताप नगर,न.पा.समोरील भाग,तांबेपुरा पैलाड,सानेनगर,अमलेश्वर नगर,इस्लामपुरा* या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये एकुण जवळपास *७०००* कुटुंबीयांसाठी जवळपास *१५०* स्वयंसेवकांमार्फत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले आहे.
वरील सर्व १५० स्वयंसेवकांना स्वयंसुरक्षेसाठी *मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील* यांच्याकडून प्रत्येकी एक *सॅनिटायजर बाटली* वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी *मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील*, प्रांताधिकारी *सौ.सिमा अहिरे*,तहसिलदार *श्री.मिलींद वाघ*,नगरपरिषद मुख्याधिकारी *सौ.विद्या गायकवाड*,नगरपरिषद गटनेते *श्री.प्रविण पाठक*,नगरपरिषद प्रशासन अधिकारी *श्री.संजय चौधरी*, *डाॅ.श्री.विलास महाजन*, *श्री.महेश जोशी* उपस्थित होते.
