आद.रणरागिणी गितांजली ताई कोळी,,,,,
एकला चालो रे म्हणत गपगुमान मणभर सेवा करुनही कणभर ही गाजावाजा न करता आपण या कोरोना संकटाशी लढा देत आहात,
असतांना देणं वेगळं पण नसतांना देणं हे फार मोलाचे असते,स्वतःची आर्थिक स्थिती जेमतेम असतांना,कुठलही शासकीय पद वा जबाबदारी नसतांना,कुणाचेही संरक्षण नसतांना आपण स्वतः व जो येईल त्याच्या सोबत,आपण या सेवा यज्ञात स्वतःला झोकुन दिले आहे,
लाॅकडाऊन मुळे अडकलेले,निराधार,रस्त्यावरचे,झोपडपट्टीतले गरीब व गरजु लोकांच्या पोटात तुम्ही दोन घास टाकलेत.स्वतः पातेलंभर खिचडी करायची ती डब्यात भरायची व आपल्या एक दोन चार सखींना घेऊन पायी पायी निघायचं.वाहन नाही,रिक्षा नाही पायपीट करत जेथे जेथे ऊपासी दिसतील त्या गरजुंना तुम्ही सतत २१ दिवस खिचडी भरवली,
"खिचडीवाली ताई" येईल म्हणुन आपली ईवलीशी चोच आं वासुन लहान लहान लेकरे तुमची वाट पाहायचीत, तुम्ही घामाघुम होऊन ५/६ किमी चालत या लेकरांना भरवलं.
ताई,
घरात बसुन आम्हाला हे समजणार नाही.पण तुम्ही ती भुक पाहिली,ती आंस पाहिली आणि सेवा दिली.
खुप असामान्य कार्य तुम्ही केलत,या विदारक स्थितीत केंव्हा करोना राक्षस छुपा वार करेल याची भिती न बाळजता आपण तळहातावर शीर घेऊन लढत आहात.
या लोकांना कौरोना संकटची माहीती देऊन,त्यांच्या भाषेत काय काळजी घ्यावी हे सांगताहेत.मुलांना समजवत आहेत.त्यांना सॅनीटायझर,साबण पुरवत आहात,गाठचे पैसे टाकतात,"जो देगा ऊसका भला, ना देगा ऊसकाभी भला"अशी संन्यस्थ वृत्ती ठेऊन काम करीत आहात.ते ईतकं सत्यं,शिवम् सुंदरम् आहे की देणारे देऊन जातात!कुणी गाडीवर बसवुन पोहचवून देतात,,त्यांचंही मी कौतुक करतो,
करोनाचे संकट असतांनाही भामपूर(शिरपूर) येथील जळीत पिडीता महीलेला स्वता जिल्हा रुग्णालयात जाऊन तिच्या साठी धावपळ करून गाड्या बंद असतांनाही देवपूर ते चक्करबर्डी सिव्हिल पाच सहा कि. मी अंतर चालत जाऊन तिला व तिच्या कुटुंबीयांना सर्वप्रकारची मदत केली...धीर दिला सिरीयस केस असतांनाही धावपळ करून तिचा जीव वाचवण्यासाठी शर्थ केली आणि त्या महीलेचा जीव वाचला.
सलाम आहे ताई तुमच्या कार्याला
हे तमाम योध्द्यांनो,
आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत.
आमचे दुवे,आशीर्वाद,सदिच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.तुम्ही एकटे नाहीत.
पाठीवर हात ठेऊन तुम्हाला लढा म्हणुन हूरुप देणारी आहोत,आम्ही दिसत नसलो तरी सोबतच आहोत.ज्याच्या पाठीशी हे दुवे असतात त्याला कधीही अपयश येत नाही व त्याचे अनिष्टही होत नाही.मी आस्तिक असलो तरी मंदिरातल्या देवांपेक्षा अशा तुमच्या सारख्या देवतांपुढेच मी नतमस्तक होतो तीच माझी श्रध्दा असते व या दुवा आशीर्वादांमध्ये भलं करण्याची ताकद असते हा विश्वास ही आहे,
हे योध्यांनो!
तुमचा हा त्याग,सेवा,मेहनत कधीच वाया जाणार नाही,मानव त्याचा सन्मान तर करेलच पण ईतिहासही तुम्हाला सदैव स्मरण करत राहिल हे मात्र निश्चित.
चला गड्यांनो,
नव्या दमाने ऊभे राहु
आत्माविश्वासाने युध्द लढू
विजयाची रेषा
समोरच आहे
हसत खेळत युध्द जिंकु
कचणार नाहीत
खचणार नाहीत
घेतला वसा टाकणार नाहीत
सेवा आपली मोल अनमोल
कधीच विसरणार नाहीत
पुन्हा तुम्हाला व तुमच्या सोबतच्यांना प्रणाम करुन कृतज्ञता व्यक्त करतो.
———मोहनदास भामरे
९८५०५१५४२२

