Halloween party ideas 2015


एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांचा पाठलाग करत सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज
शतक हा कोणत्याही फलंदाजाच्या स्वप्नपूर्तीचा क्षण असतो. तसं बघाल तर शतक बनविणं इतकं सोपं नाही. त्यासाठी फलंदाजाजवळ तंत्र व कौशल्य असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची शारिरीक व मानसिक स्थिती सदृढ असणे आवश्यक असते. हे सर्व जुळून आलं तर फलंदाज शतकाचं उद्दीष्ठ सहज साध्य करू शकतो. प्रथम फलंदाजी करणं शतक बनविणं तसं सोपं असतं परंतु विजयी लक्षाचा पाठलाग करताना शतक करणं फार कठिण काम असतं. परिस्थितीशी जुळवून घेताना फलंदाजाला स्वतःच्या कुवतीचाही विचार करावा लागतो. अशा बिकट प्रसंगी जेंव्हा एखादा फलंदाज शतक ठोकतो तेंव्हा तो फलंदाज कौतुकास पात्र ठरतो.
या लेखात आपण वनडे सामन्यात दुसऱ्या डावात म्हणजे धावांचा पाठलाग करताना १० पेक्षा जास्त शतक करणाऱ्या जगातील चार जिगरबाज खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत.विशेष म्हणजे या चार जणांत तीन भारतीय खेळाडू सामील आहेत.
या अदभूत क्लबमध्ये विक्रमी शतकांच्या साह्याने अग्रस्थानी असलेला खेळाडू आहे भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली. वनडे सामन्यात कोहली २३९ डाव खेळला त्यात ५९.३ च्या सरासरीने ११८६७ धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्याने ४३ षटके फटकविली आहेत, तर धावांंचा पाठलाग करताना २६ षटके त्याच्या नावे जमा असून त्यातील २२ सामन्यात भारत विजयी ठरला, तर ४ वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
लक्षाचा पाठलाग करणारा सध्या नंबर दोन खेळाडू आहे भारताचाच विक्रमादित्य सचिन तेंडुलकर. कोहलीने सचिनचा हा विक्रम मोडून नवा विश्वविकम प्रस्थापित केला. सचिनने ४६३ सामनात ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतकांसह विश्वविक्रमी १८४२६ धावा बनविल्या आहेत. सचिनने टार्गेट चेेस करताना एकूण १७ शतके ठोकली आहेत. त्या १७ शतकांपैकी १४ वेळा भारत जिंकले असून तीन वेळा भारताला हार मिळाली.
या जबरदस्त क्षमता असलेल्या खेळाडूंच्या जादूई यादीतील तिसरा खेळाडूही भारताचा आहे, आणि तो आहे विद्यमान उपकर्णधार रोहीत शर्मा. सचिन तेंडुलकर प्रमाणेच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून करणाऱ्या रोहीत शर्मानचे नशिब सलामीला यायला लागल्यापासून उजळले. सन २०१३ च्या भारताने जिंकलेल्या चॅम्पी्यन्स ट्रॉफीद्वारे रोहीतला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. रोहितने आजवर वनडेत २१७ डांवात ४९.२७च्या सरासरीने २९ शतकांसह ९११५ धावा ठोकल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना त्याने १४ शतके ठोकली आहेत. त्याची सर्व शतके कामी आली आहेत.
या अनोख्या क्लबमधील एकमेव परदेशी खेळाडू आहे विंडीजचा डावखुरा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल. युनिव्हर्सल बॉस म्हणून सुपरिचीत असलेला गेल एकूण ३०० वनडे सामने खेळला. त्यातील २९४ डावांत खेळताना ३७.७ च्या सरासरीने २५ शतकांसह १०४८० धावा कुटल्या आहे. या दरम्यान धावांचा पाठलाग करताना १२ शतकेही लगावले आहेत.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.