कोरोना साथीत अमळनेर शहरातील हजारो गोर गरिबांसाठी सुरू असलेल्या अन्नदानाच्या ४१ व्या दिवसाचा खर्च सामूहिक पणे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते, खरीदिदार सर्व व्यापारी बांधवानी उचलत सामाजिक उत्तरदायित्व निभावले.
गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे सुरू असलेल्या अन्नदानासाठी अनेक दाते पुढे येत आहेत.आ.अनिल पाटिल, मा.आ.स्मिताताई वाघ ,कृ उ बा सभापती प्रफुल्ल पाटिल यांच्या पुढाकाराने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडतदार, खरीददार सर्व व्यापारी बांधवानी शहरातील हजारो गोर गरिबांच्या एक दिवसाचा अन्नदान खर्च उचलत सामाजिक उत्तरदायित्व निभावले.यावेळी श्रीमती भानूबेन शहा गोशाळा येथे
व्यापारी हरी भिका वाणी,संचालक शंकर सेठ बितराई, रमेश पुनमचंद छाजेड,ललित बाफना,प्रकाश वाणी,योगेश महाजन,निशांत पारेख आदिंनी उपस्थिती देऊन अन्नदान केले.गोशाळेतर्फे चेतन शहा व सहकारी यांनी सर्व दाते व पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी आ अनिल पाटिल, मा.आ.स्मिताताई वाघ,सभापती प्रफुल्ल पाटिल तसेच अन्नदानासाठी आर्थिक मदत करणाऱ्या व्यापारी, आडते, खरीदिदार दात्यांचे आभार मानले.अन्नदानासाठी गोशाळेस विविध केंद्रांवर राजू सेठ,पंकज दोडीवला,मनोज चौधरी, गोपाळ कुंभार, दिलीप पाटिल, प्रताप पाटिल,आबा पाटिल,संदिप घोरपडे,तसेच प्रा अशोक पवार,रणजित शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.

