Halloween party ideas 2015



सेवानिवृत्ती बद्दल दोन शब्द.......

क्रिडा शिक्षक एन.ए.साळुंखे एक सेवाव्रती ,सरळ मनाचा माणूस...

निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छांचा सण आहे
पाऊल बाहेर पडतांना
रेंगाळणारं मन आहे...

शिक्षक हा समाजाचा सेवक असतो.प्रत्येक व्यक्तीला आपल्या जिद्दीने जीवन यशस्वी करता येते.शिक्षक हा कधीही रिटायर्ड होत नाही तर तो रि-टायर्ड होतो.त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरवात तेथून पुढे समाजासाठी होते.
"आबा"एक सेवाव्रती ,सरळ मनाचा माणूस, फक्त शैक्षणिक क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करत असतांना प्रामाणिकपणे सेवा करणे हेच कर्म,तोच धर्म!असे मानणारा कृतिशील क्रिंडाशिक्षक एन.ए.साळुंखे यांच्या ३१ मे सेवानिवृत्ती बद्दल दोन शब्द.....
आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं!पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र,सदैव अबाधीत राहील!
तुमच्या सहवासात एक लहाण बंधू म्हणून घालवलेले अनेक क्षण आजही मला आठवतात....
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, आम्हाला सतत आठवतच राहील...
तुमचं इथून पुढचं आयुष्यही असचं सुखसमाधानाचं जावो हिच प्रार्थना.

श्री.एन.ए.साळुंखे सर यांनी बी.ए.बी.एड(फिजिकल) शिक्षण घेऊन नुतन मराठा संस्थेत क्रिडाशिक्षक म्हणून 1987 मध्ये रूजू झाले. घरची परिस्थिती गरीबीची होती.वडील आदर्श शेतकरी व सामाजिक कामाची आवड असल्याने खेडगांव ता.चाळीसगाव येथे सरपंच भूषवीत विकासासाठी सदैव कटिबद्ध राहिले.व घरातील वातावरण धार्मिक होते.
जळगांव जिल्ह्यात खेडगांव ता.चाळीसगाव येथील साळुंखे परीवाराचा मोठा इतिहास आहे. सामाजिक, शैक्षणिक, देशसेवा,राजकीय, पत्रकारीता, वैद्यकीय क्षेत्रात अनेक नागरिक व महीला कार्यरत आहेत.
तिन मुले.. मोठा चिरंजीव बँकेत होते.त्यांनी ही ईमानेइतबारे सेवा करुन निवृत्त झाले. आबासाहेब शिक्षक तर लहाण आदर्श शेतकरी आहेत.असा सुखी समाधानी परीवाराला चांगले दिवस आले असतांना ते पहाण्यासाठी आई वडील आज नाहीत.. ते वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. पण त्यांचा आशिर्वाद तिन भावांना असल्याने ते सुखी समाधानी जीवन जगत आहेत.
कोणतेही कार्य करीत असतांना एका यशस्वी पुरूषांच्या मागे एका पत्नीचा हात असतो..या उक्तीप्रमाणे सरांच्या प्रत्येक सुख व दुख्खात आमच्या वहीनी वंदना साळुंखे झाडाच्या सावलीसारख्या खंभीरपपणे उभ्या राहील्या.सरांना दोन मुले..दोन्ही सोज्वळ.. मोठा मुलगा सुमीत पुणे येथील नामांकित महाविद्यालयात एम.सी.ए करीत आहे. तर लहान चिरंजीव अक्षय प्रताप महाविद्यालयात विज्ञान विषायात बी.एस.सी करीत आहे. घरचे वातावरण अत्यंत खेळीमेळीचे आहे.सरांनी अनेक मित्रपरीवारांचा गोतावळा निर्माण केला.
आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर व संस्थेचे शहाजीराव साळुंखे यांच्या सहकार्याने नुतन मराठा संस्थेत नोकरीत रूजू झाले.अगोदर नोकरीची सुरुवात शेवगे ता पारोळा येथे 2 वर्षे केली. त्यानंतर संस्थेच्या अनेक संस्था असल्याने त्यानंतर कळमसरे ता.पाचोरा येथे तिन वर्षे, वावडे ता.अमळनेर येथे 22 वर्षे, कासोदा येथे 3 महीने, त्यानंतर सेवानिवृत्ती शिवाजी हायस्कूल हातेड ता.चोपडा येथे 4 वर्षे सेवा केली.
सर ,शैक्षणिक क्षेत्रांत कार्य करत असतांना सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात आवड असल्याने पत्रकारिता क्षेत्रांत पदार्पण करतांना जेष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.एकला चलो रे,दैनिक गावकरी,लोकमत या वृत्तपत्रात कामाची सुरुवात केली.महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी व पत्रकार ईश्वर महाजन,विजय पाटील यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाची शाखा २००६ मध्ये स्थापन केली. पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक पदे भूषवत अनेक पुरस्काराने पुढे सन्मानित करण्यात आले.अनेकवेळा पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात हजेरी लावली.
शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे पुज्य सानेगुरुजी शिक्षक पतपेढी अमळनेर येथे संचालक म्हणून निवडून आले.दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गटशिक्षणाधिकारी यांच्या विश्वासामुळे ते कस्टडीयन म्हणून काम पाहिले.
एन.ए.साळुंखे सर यांना आबा टोपन नावाने सर्वपरिचित होते.शाळेत क्रिडाशिक्षक म्हणून प्रामणिकपणे जबाबदारी पार पाडत.शाळेत विदयार्थ्यांनच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा यांचे आयोजन करीत. थोर पुरूषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करत.ज्या शाळेत नोकरीला असत त्याठिकाणी गावातील सामाजिक कामात सहभाग राहत असत.शाळेत वृक्षारोपण, एड्स जनजागृती सप्ताह, लोकसंख्या दिवस ,राष्ट्रीय सण यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा असत.क्रिडा शिक्षक म्हणून शाळेत कार्य करतांना विदयार्थ्यांनी स्पर्धात्मक असावे यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरीय स्पर्धेत विदयार्थ्यांनचा सहभाग असत.शाळेत १५ आँगस्ट व२६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरा करतांना क्रिडाशिक्षक म्हणून अनेक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम बसवीत असत.त्यांच्या उत्कृष्ट कार्यक्रमात गावकरी, पालक अभिनंदन करीत असत.३३ वर्षाच्या सेवेतून निवृत्ती घेतांना संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ याचे सहकार्य मिळाले. संस्थेच्या अनेक शाळा असल्याने शाळेतील मुख्याध्यापक के.ए.पाटील(शेवगे ता.पारोळा),कळमसरे ता पाचोरा येथील गोसावी,राष्टपती पुरस्कार मुख्याध्यापक जी.ए.चौधरी(वावडे ता अमळनेर) ,कासोदा येथील बी.जी.पाटील, व सेवानिवृत्ती हातेड ता चोपडा येथील मुख्याध्यापक एस.एम सोनवणे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य मिळाले. शिक्षकामध्ये मला एक मार्गदर्शन व जेष्ठ बंधू म्हणून डि.बी.साळुंखे, आर.बी.पाटील,पी.बी.पाटील, जी.बी.पाटील, एस.डी.वाघ,एस.एच पाटील, डि व्ही,सोनवणे यांनीही मला सेवेत असतांना सहकार्य केले असल्याचा मला अभिमान आहे.
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल आठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ओबीसी शिक्षक असोसिएशन जळगांव, महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर, भारतीय मानव विकास सेवा संघ,महाराष्ट्र युवा फेडरेशन जळगाव अशा विविध सामाजिक संस्थेत कार्य केले.
आबांचे अभिनंदन कसे करावे..हा मला नेहमीच प्रश्न पडतो.एखादी व्यक्ती इतकी शैक्षणिक, व सामाजिक दृष्टीने संपन्न असल्याचे दुर्मिळ उदाहरण ठरते.मित्रपरीवारांच्या गोतावळ्यात सरांच्या शब्दाला मान आहे.मैत्रीत त्यांनी कधीही बेगडीपणा किंवा दिखाऊपणा साध्य केला नाही. जे काही बोलायचे किंवा करायचे ते अगदी उत्सफूर्त केले. परिणामाची कधी चिंता केली नाही बोलायचे ते उत्स्फूर्तपणे रोखठोक कुणालाही न दुखविता प्रत्येकाला आबांनी मित्र केला, मित्रांचा सागर केला. त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळात कोण कोण नाही? श्रीमंतापासून अगदी गरीबापर्यत त्यांनी मैत्री केली.. केवळ मैत्री न ठेवता ती जिवापाड जपत आलेले आहेत..
आबामध्ये सहकार्य वृत्ती नसानसात भरलेली होती.
३१ मे २०२० रोजी क्रिडाशिक्षक म्हणून ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे...
तुमच्या सहवासात आमच्या वहिनी व परिवार खंबीरपणे उभ्या राहिल्यात. त्यांचा शांत स्वभाव बरंच काही सांगतो. फुलांच्या परीमलासारखा आपल्या कर्तुत्वाच्या सुगंध उत्तर महाराष्ट्रात दरवळत राहीला.
तुमच्या आयुष्याचा प्रवास या वळणावर आलेला असताना आठवतायत़ं आजवर तुम्ही घेतलेले कष्ट, तुमची साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे तुम्ही ठेवलेला एक आदर्श .....येथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुखी समृद्धी जीवन व चांगले आरोग्य देवो हीच तुमच्या सेवापुर्ती सोहळया निमित्याने प्रार्थना व शुभेच्छाही!..

शब्दसंकलन
श्री आय आर.महाजन
शिक्षक तथा पत्रकार
9860352960
9766939950

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.