Halloween party ideas 2015


सोशल डिस्टंसिंग-काळाची गरज.
आज सोशल डिस्टंसिंग हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरात आहे. जो तो आपला सोशल डिस्टंसिंगचे पालन करताना दिसत आहे. काय आहे हे सोशल डिस्टंसिंग आणि आपण का त्याचा उपयोग करायचा? आणि हा इतका महत्त्वाचा आहे की आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण याचे नेमके उत्तर काय हे कोणालाही माहिती नाही.
आज एका व्हायरसमुळे संपूर्ण जग लाँकडाऊन झाले. एकीकडे या व्हायरसकडे बघायचे का अर्थव्यवस्था सांभाळायची असा प्रश्न संपूर्ण जगाला पडला. त्यामुळे काही प्रमाणात लाँकडाऊन शिथिल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
एक अतिशय सूक्ष्म व्हायरस जगाचा नाश करण्याच्या तयारीत आहे. याची संपूर्ण जगात एवढी दहशत आहे की एखाद्या देशाने दिलेल्या युद्धाच्या धमकीने सुद्धा इतकी दहशत निर्माण झाली नाही.कोणतेही युद्ध न होता एवढी माणसे मूत्यू पावणे हे संपूर्ण जगात पहिल्यांदा घडत आहे.आणि या विषाणूमुळे लाँकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यासारखे शब्द आपल्या दैनंदिन जीवनातील एक भाग झाले.
पण सोशल डिस्टंसिंग हा शब्द पूर्वी सुद्धा वापरला आणि अमंलात आणला जात असे. सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती अनुसार गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव हे एका प्रकारे सोशल डिस्टंसिंग होते.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे लाँकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु काही लोकांकडून याचे पालन होताना दिसत नाही.
अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार संपूर्ण जगाला दोन ते तीन वर्षेतरी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास लाँकडाऊन हटविण्यात येईल परंतु पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत यावर लस तयार होत नाही तोपर्यंत याचे पालन करणे आवश्यक आहे
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ,सोशल डिस्टंसिंग म्हणजे लोकांनी कमीतकमी १ मीटर किंवा ३ फुटांचे अंतर एकमेकांमध्ये ठेवणे.खोकणे आणि शिंकण्याच्या माध्यमातून कोरोना विषाणू सगळीकडे पसरु शकतो.आणि सध्याच्या घडीला त्यावर एकच उपाय तो म्हणजे "सोशल डिस्टंसिंग पाळा".राज्य सरकारने सुद्धा यावर अनेक उपाययोजना केल्या आहेत.परंतु नागरिकांनी सुद्धा काही उपाययोजना स्वतः हून केल्या तर यावर मात करता येईल.
१) कोणाच्या जवळ जास्त जाणे टाळले पाहिजे.
२)कोणत्याही कार्यक्रमाच्या दरम्यान गर्दी करु नये.
३) १५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
४)बाजार,माँल यासारख्या ठिकाणी गर्दी करु नये.
आणि या सर्व गोष्टीचे पालन कमीतकमी २ वर्षे तरी करणे आवश्यक आहे.आणि जमेल तर आयुष्यभर केले तरी आपल्यासाठी चांगले आहे,आणि हे आता काळाची गरज आहे.
देशावर एखादे संकट आले की सगळे एकत्र मिळून त्याचा सामना करतो. त्याप्रमाणे कोरोनासारखे संकट दूर करण्यासाठी" सोशल डिस्टंसिंग " हा एकमेव उपाय करून त्याचा सामना करु.

लेखिका.
अमिता कदम,
प्राध्यापिका,
पुणे.
9819395788.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.