कोरोना काळात मानसिक ताण तणाव होवू नये, लोकांचे मनोबल उंचावे आणी आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वाणेगांव पोलीस पाटील तथा योगा प्रशिक्षक श्री नितीन जमदाडे यांनी वाणेगांव येथे जिल्हा परिषद शाळेत सोशल डिस्टंन्स चा वापर करून योगा व प्राणायाम सत्र घेतले ...
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी योगा व प्राणायाम वर जास्तीत जास्तं भर द्यावा ..आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी ...तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करा ,घरातच थांबा, योगा व प्राणायाम करा, मास्क चा वापर करा, स्वच्छता ठेवा असा संदेश देवून जनजागृती वर भर देवून पोलिस पाटील नितीन जमदाडे कोरोना यौद्धयाची भूमिका बजावत असल्याचे या निमित्ताने लक्षात येते ...त्यांनी नागरिकांना प्राणायाम, योगासने यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यायामाचे सल्ले देवून प्रतिकारशक्ती कशी वाढेल यावर मार्गदर्शन केले ..
यावेळी ग्रामसेवक श्री नंदकिशोर पाटील, तलाठी श्री सागर बागूल, शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र शिंदे, मनोज आबासाहेब पाटील, अप्सर तडवी, प्रकाश अशोक पाटील, सुकदेव आव्हाड, मोतीलाल गायकवाड,कोतवाल महेंद्र राऊतराय, सुरेश दौलत सोनवणे, दिलदार तडवी, निलेश बापू लोहार, आदी नागरिक उपस्थित होते ...
फोटो
*प्राणायाम प्रात्यक्षिक करतांना योगा प्रशिक्षक तथा पोलीस पाटील नितीन जमदाडे
