Halloween party ideas 2015

*जिल्ह्यातील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना निवृत्ती नंतरचे लाभ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तात्काळ मिळावेत*

(समता शिक्षक परिषदेची मागणी)

भातखंडे (प्रतिनिधी) महाराष्ट्र समता शिक्षक परिषद जळगाव शाखेच्या वतीने जळगाव जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, उपदान, भविष्य निर्वाह निधीची रक्कम व अंशराशीकरण करिता प्रस्ताव व विविध कागदपत्रांची पूर्तता विहित मुदतीच्या आत पूर्ण करावी लागत असते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता परिस्थिती मात्र सामान्य राहिलेली नाही. जे शिक्षक येणाऱ्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना शिक्षण विभाग, लेखाधिकारी विभाग, वेतन विभाग, या सर्व ठिकाणी ये-जा करणे, चकरा मारणे, प्रस्ताव देणे, कागदपत्रे सादर करणे, विविध त्रुटी पूर्ण करणे या सार्‍या बाबी आता सहज सोप्या राहिलेल्या नाहीत.
सदर परिस्थितीचा विचार करता
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सेवानिवृत्ती संदर्भातील सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन करण्यात यावी व शासनाच्या वेळोवेळी निर्गमित झालेल्या आदेशानुसार विहित मुदतीच्या आत सेवानिवृत्तीचे सर्व लाभ शिक्षकांना देण्यात यावेत. सदर प्रक्रियेत विलंब झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील सूचना सर्व विभागांना देण्यात याव्यात. तसेच विलंब झाल्यास सेवानिवृत्तीनंतरच्या लाभावर भविष्य निर्वाह निधी वरील व्याज संबंधित शिक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा आपणाकडे सदर निवेदनाद्वारे करीत आहे. सदर मागण्यांचा विचार व्हावा, विनंती. जिल्हाध्यक्ष बी एन पाटील, प्रमोद आठवले जिल्हाध्यक्ष महिला छाया बैसाने- सोनवणे, रणजित सोनवणे जिल्हा सरचिटणीस यांनी केली आहे सदर निवेदनाची प्रत मा. शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे यांना देण्यात आलेले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.