Halloween party ideas 2015


*अंतुर्ली बु येथे कै. सौ . कविता पाटील यांच्या स्मरणार्थ आर्सेनिक अल्बम -३० या रोग प्रतिकारक गोळ्यांचे वाटत औषधांचे वाटप*

भातखंडे(प्रतिनिधी): - येथून जवळच असलेल्या अंतुर्ली बु येथे कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर कै सौ कविता चुडामन पाटील ग्रामपंचायत सदस्या अंतुर्ली बुद्रुक यांच्या स्मृती प्रित्यर्थ गावातील नागरीकांची रोगप्रतीकारक शक्ती वाढावी म्हणुन आर्सेनिक अल्बम ३० या होमीयोपॅथीक औषधांचे निशुल्क वाटप सुरू करण्यात आले . यावेळी अंतुर्ली येथील ज्येष्ठ नागरिक जयवंत आप्पा पाटील, माजी सरपंच माधवराव भिवसन पाटील हे उपस्थित होते.गोळ्या वाटपाच्या वेळी कै. सौ.कविता पाटील यांच्या स्मृती जागृत झाल्या होत्या. कै. सौ कविता पाटील ह्या आंचळगाव शाळेचे उपशिक्षक तर अंतुर्ली बु येथील रहिवासी एक सेवाभावी शिक्षक चुडामण जयवंत पाटील यांच्या त्या धर्म पत्नी होत्या.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.