कळमसरे येथील रघूनाथसिंग राजपूत यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
रघूनाथसिंग राजपूत यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जय गणेश फाऊंडेशनच्या वतीने सहपत्निक सन्मान पत्र देऊन सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
- ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पाहायला मिळतो त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कळमसरे येथील ओमशांती परीवाराचे कट्टर भक्त रघूनाथसिंग राजपूत होय.
कळमसरे गावातील रघूनाथ राजपूत अत्यंत गरीब कुढुंबात जन्म.. परिस्थिती जेमतेम. घरातील अठरा विश्व दारिद्र्य असतांना इमानेइतबारे सालदारकी केली.कळमसरे येथील रघूनाथ पौलाद राजपूत यांच्याकडे कित्येक वर्ष सालदारकी केली.. पण दोघांनी प्रामाणिकपणा सोडला नाही. दोघांनी खुप कष्ट केले...रोजदारांने कामाले गेले.आपल्या मूलाला शिकवले...त्यांचे एकच स्वप्न होते मूलगा स्वाताच्या पायावर उभा राहिला पाहिजे.. आम्ही जे कष्ट केले ते आपल्या मूलाने न करता,नोकरी करून सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे.. हा त्यांचा उद्देश होता.म्हणतात ना,मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे मुलाने आई व वडीलांच्या परिस्थीतीचे गांभीर्य ओळखले. व त्यांचे पाहिलेले स्वप्न पुर्ण केले. मुलगा नोकरीला लागला.. आई वडिलांच्या चांगल्या कामाच्या पावतीमुळे,आशिर्वादाने सुनबाई सोज्वळ, गुणी व नोकरीला...परीवाराचा आनंद द्विगुणित झाला... मुलगा व सुनबाई सासु व सासरे यांची सेवा करीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
शिक्षकी पेशा स्विकारल्यानंतर आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने मुलगा देवेंद्र व सुनबाई मनिषा गरजूंना वाढदिवसाच्या निमित्ताने एक हात मदतीचा दिला.... कोरोनाच्या पाश्वभूमीवर व लाँकडाऊनमुळे अनेक नागरिक व महीला यांचे उदयोग बंद पडले ..उपासमारीची वेळ आली..आई वडीलांच्या ५१ वा वाढदिवस व वडीलांची ७५ वी असा हा योगायोग व मुलांचा लग्नाचा १८ वाढदिवस हे साजरा केला तर भरपूर पैसा खर्च होतो. या सर्व गोष्टीना फाटा देत गरजूंना किराणा माल वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देवेंद्र राजपूत व मनिषा राजपूत जय गणेश संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. कळमसरे आपल्या जन्मभूमीतही सामाजिक बांधीलकी जोपासत असल्याचे आम्हाला सार्थ अभिमान आहे.
तुमच्या आयुष्याचा प्रवास या वळणावर आलेला असताना आठवतायेत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट ,तुमची साधना आणि जगण्यातून आमच्यापुढे ठेवलेला आदर्श ....इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर आपणास सुख समृद्धी जीवन देवो हीच तुमच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व शुभेच्छाही!
💐🎂🎂🎂🎂🎂💐💐💐
कळमसरे गावात रघुनाथ बारकू राजपूत हिर कोर बाई रघुनाथ राजपूत लग्नाच्या 51 वा वाढदिवस व मुलगा देवेंद्र राजपूत सुनबाई मनीषा देवेंद्र राजपूत यांच्या 18 वा वाढदिवस दिनांक 20 5 2020 श्री रघुनाथ राजपूत व पत्नी पन्नास वर्ष पन्नास वर्ष साल दारी करून व पत्नीने मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिकवले व स्वतः प्रजापिता ब्रह्मकुमारी व पाठशाला येथे तीस वर्ष ज्ञान घेतले परम अर्थ करत असताना त्यांना त्यांच्या मुलाला कालांतराने मुलगा नोकरीला लागला सुनबाई सुद्धा नोकरीला लागली म्हणून एक गरीब कुटुंबाला जनु शिवबाबाची भगवतीने व शक्तीने जणू हे परिवार संगम योगातून राज योगात पदार्पण केले व त्यातून हे परिवार सध्या सध्या नोकरी निमित्ताने भुसावळ येथे वास्तव्याला आहे सध्या जगात कोविंड 19 या आजाराने संपूर्ण संपूर्ण जगाला ग्रासले आहे व त्यातून गरीब व निराधार कुटुंबाला वडील रघुनाथ राजपूत व मुलगा देवेंद्र राजपूत यांच्या लग्नाचा लग्नाच्या वाढदिवस आपण स्वतः परिवारात काही साजरा न करता त्यातून आपल्या गावातील गरजू व निराधार कुटुंबाला त्यांनी मदतीच्या हात दिला .20 मे रोजी वडील 75 वर्षांचे झाले तो अमृत महोत्सव आपण घरी घरी न साजरा करता गरिबांना मदत करावी असे त्यांना वाटले असे म्हणावे एकदाणी होणे यासाठी पूर्वी जन्माचे पुण्य लागते त्यासाठी कवी सुरेश भट असे म्हणतात
'देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात ही घ्यावा".या म्हणीप्रमाणे आपण समाजाचे देणे लागतो म्हणून एक गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असे देवेंद्र राजपूत याने मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले.
भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशनच्या वतीने जेष्ठ नागरिक संघ भुसावळ चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेशजी नेमाडे, समन्वयक अरूण मांडाळकर सर,गणेश फेगडे सर यांनी रघूनाथसिंग राजपूत यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व मुलाला योग्य संस्कार दिल्याबद्दल सहपत्निक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
