Halloween party ideas 2015


कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा निहाय झोन ऐवजी तालुका निहाय झोन करा.

लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
 
सध्या अमळनेर  तालुक्यातील कोरोना बांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यासाठी चिंता करणारी बाब आहे. कोरोनो बांधीतांचा जिल्हा झोन ऐवजी तालुका झोन करण्यात यावा अशी मागणी
अमळनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील
 पत्राद्वारे मुख्यमंत्री व इतर मंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा
प्रादुर्भाव दिवसें-दिवस मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत असून, त्याचा प्रादुर्भाव
टाळणेकामी आपले माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भरीव प्रयत्न युध्दपातळीवर केले जात आहेत.ही अभिनंदनीय व जनतेला दिलासा देणारी बाब आहे.
02/- तदनुसार आमच्या जळगांव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेने शहर नागरी क्षेत्रात आपल्या शासनाच्या वेळोवेळीच्या सुचनानुसार नगरपरिषद प्रशासनाने गांभीपुर्वक लक्ष देवून अथक परिश्रम घेवून, प्रचार व प्रसिध्दी सर्व माध्यमांव्दारे मोठ्याप्रमाणात केल्यामुळेच अमळनेर नगरपरिषदेने 8 मार्च,2020 या जागतिक महिला दिनाचे नियोजित
कार्यक्रम रद्द केले होते. 22 मार्च, 2020 जनता कपर्यु, 24 मार्च,2020 ते 3 मे,2020 लॉकडाउन घोषीत हावून जनतेने या उपक्रमास उस्फुर्त साथ देवूनही लॉकडाउन, सोशल डिस्टेन्सींग बाबतचे नियमांची पायमल्ली करून बाहेरुन येणा-या नातेवाईक आप्तेष्टांमुळे कोरोना संसर्गाची सुरवात झाल्यामुळे अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची
संख्या 10 पावेतो झाली आहे. दुर्दैवाने त्यापैकि 2 बाधीत इसम मृत्यु पावले आहेत.कोरोना संशयीतांची संख्याही 24 असून 101 नागरीक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 03/- महसूल, गृह, आरोग्य आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी गेल्या एक महिन्यापासून रात्रंदिवस मेहनत घेत असूनही 5 टक्के जनतेच्या असहकार्य ।
अज्ञानामुळे कोरोना विषाणूच्या संकटामध्ये अनपेक्षीत वाढ होत असल्याने जनता व
प्रशासनही हादरले आहे. 04/- अमळनेर शहरासह तालुक्यातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून कोरोनाच्या संकटावर लवकरात लवकर मात
व नियंत्रण करण्यासाठी 15 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्याठिकाणी संख्या वाढत आहे तो "रेडझोन" जिल्हानिहाय निकषा ऐवजी "तालुकानिहाय" निकष लावून 5 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत तो भाग "रेडझोन" ग्राह्य धरून तसे सुधारीत
दिशा-निर्देश नागरी हित-सुरक्षितततेस्तव जाहीर करावेत अशी विनंती आहे.
अमळनेर शहरासह तालुका "रेडझोन" जाहीर करून केंद्र व राज्य शासनाच्या
आदेश व निर्देशांचे काटेकोरपणे अंमलबजावणी/पालन करुन कोरोनाच्या या
संकटावर आपण सर्व एकत्रितपणे लवकरच मात करू या, असे पत्रात म्हटले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.