कोरोनाचे प्रादुर्भाव वाढून संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती करणे,बाधित क्षेत्रातील सर्व्हे करून रहिवाशांची आरोग्य विषयक माहितीचे संकलन करणे आदी कामे जिल्हाधिकारी डॉ, अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार अमळनेर नागरी भागातील अंगणवाडी कर्मचारी नियमितपणे करीत आहेत.असे असतांना नगर पालिका आरोग्य अधिकारी व कर्मचारी न.पा.दवाखान्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी बोलवतात आणि पटांगणात उभ्या करून बैठक घेऊन अपमानास्पद वागणूक देतात बैठकीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नसते. नियमितपणे काम करूनही वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असतात. कोरोनाचे कामाचे योग्य प्रशिक्षण दिले नसतांना हॉट्पॉट असलेल्या तसेच गैरसोयीच्या ठिकाणी कामे देणे आणि त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना बाधित क्षेत्राबाहेरील सोयीच्या ठिकाणी कामे देणे अशा प्रकारे भेदभावाची वागणूक देणे, कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देणे.दि.२४ एप्रिल रोजी कोरोनाचे काम करत असताना ५ ते ७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आणूनही औषधाची मागणी करूनही ते दिले नाही.आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरीलप्रकारच्या वागणुकीमुळे आम्हाला मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे कामावर विपरीत परिणाम होत असून मानसिक त्रास होत असल्याचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),जळगाव यांच्याकडे आज आयोजित बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देऊन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरील त्रासापासून सुटका करून द्यावी व खेळीमेळीच्या वातावरणात काम घ्यावे अशी मागणी केली आहे.निवेदनावर सुमारे ३५ कर्मचाऱ्यांच्या सह्या असून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच संघटनेला निवेदनाच्या प्रति पाठविल्या आहेत.
फोटो
