कोरोनामुळे संपूर्ण जग शांत झाले. लोकांना बाहेर पडणे अशक्य झाले. सगळयाचे उत्पन्नाचे साधन बंद झाले. याचा प्रभाव फक्त मोठ्यावर नाही झाला तर लहान मुलांवर सुद्धा झाला. शाळा,बाहेर खेळणे सगळेच बंद झाले. आपल्या मित्र-मैत्रिणी पासून लांब राहणे अशक्य तरीही त्याला पर्याय नव्हता.
परीक्षा रद्द झाल्याने अभ्यास आणि परीक्षापासून विद्यार्थ्यांना मोकळीक मिळाली. विद्यार्थ्यांना सरासरीच्या आधारे वरच्या वर्गात घातले गेले. अभ्यास न करता पास होणे ही ज्या विद्यार्थ्यांची मानसिकता होती त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट होती.
घरातच राहावे लागत असल्याने आणि त्यातच बाहेर खेळण्याची परवानगी नाही यामुळे मुले कंटाळून गेले असतील,कारण किती वेळ काँर्टून किंवा मोबाईल गेम्स खेळतील.त्यामुळे पण कंटाळा येईलच ना.
या काळात सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच इतर माध्यमातून अभ्यास केला तर त्याची मानसिक बुदधिमत्ता सुद्धा वाढेल.
Skills,Lumosity,Tricky Test,Logic Master,Brain Games,maths puzzle अशा आँनलाईन गेम्समुळे त्याची मानसिक बुदधिमत्ता वाढेल आणि नवीन गोष्टी शिकता येईल. कोडी टाकणे, तोंडी गणिते यासारखे बौद्धिक खेळ विद्यार्थ्यांना खेळायला देणे.पण या खेळाबरोबर नैतिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
खेळ हे फक्त शारिरीक ,बौद्धिक विकास साधतात पण त्याचबरोबर एक चांगला नागरिक सुद्धा घडवतात. शाळा बंद असल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने घरी बसून कंटाळा येतो. अशावेळी इनडोअर गेम्स खेळल्यामुळे मनोरंजनाबरोबर ज्ञानात भर सुद्धा पडते.
मोबाईल गेम,सापशिडी,ल्यूडो,कँरम
यासारखे इनडोअर गेम्स आणि वर्तमानपत्रातून नावे शोधणे, पुस्तकातल्या कथा वाचून दाखवणे,निंबधासाठी विषय देऊन मुलांना लिहिण्यास देणे. आणि दोरीवरच्या उडया हा तर मुलीचा आवडता खेळ .या खेळामुळे आनंद तर मिळतो आणि शारीरिक व्यायाम सुद्धा होतो.
सामान्य ज्ञान या विषयाची विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमात हा विषय इयत्ता पहिली पासून आहे. सामान्य ज्ञानाचा संबंध इतिहासाबरोबर दैनंदिन घडामोडींशी सुद्धा आहे. आपली बौद्धिक क्षमता किती आहे, आपल्याला एखाद्या विषयाचे कितपत ज्ञान आहे हे पाहण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. मुलांना याची ओळख जर करून दिली तर त्यांच्या ज्ञानात भर पडले.
मोजणी ,संरचना,अवकाश या संकल्पना वर आधारित व त्याच्या अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची शाखा आहे. मूळ कल्पनांचा विकास होताना प्राचीन भारत,इजिप्त, प्राचीन ग्रीस, प्राचीन चीन इ. संस्कृती मध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथात दिसतो.गणित हा विषय विद्यार्थ्यांना सोपा वाटत नसला तरी तो अवघड नाही.सोप्या पद्धतीने तो शिकता येतो.
प्रत्येक विषय, अभ्यास हा सोपा नसतो परंतु तो आपण कशा पद्धतीने हाताळतो त्यावर आपली प्रगती अवलंबून आहे.
या प्रकारे जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर पुस्तकी ज्ञानाबरोबर त्याच्या बौद्धिक विकास सुद्धा वाढेल.
-लेखिका
अमिता कदम.
ठाणे ( मुंबई )
मोबाईल : - +919819395788.
