Halloween party ideas 2015


*शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता*

*अनिल बोरनारे यांचा वेतन अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा*

मुंबई (प्रतिनिधी) एप्रिल महिन्याचे वेतन देण्याबाबत शासनाने जाहीर केले असले तरी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान कमी पडत असून शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे
भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत काल २४ एप्रिल रोजी शिक्षण आयुक्त व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालकांकडे मेल करून ही मागणी केली आहे
शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश होतो या जिल्ह्यांमध्ये एप्रिल च्या वेतनासाठी केवळ अर्धाच निधी उपलब्ध असून शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळांना एप्रिल महिन्याचे बिले सबमिट करायला सांगितले असून शाळा व ज्युनिअर कॉलेज तसेच रात्रशाळांचे देयके जमा होत आहे. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे, बयाजी घेरडे व संयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.