Halloween party ideas 2015


*कोरोना लढ्यात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना सुरक्षा साहित्य पुरवा*
*शिक्षक भारती चे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
संपादक दि.२७ एप्रिल २०२० जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची प्रशासना सोबत कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सेवा घेणे कामी माहिती मागविण्यात आलेली आहे, मात्र जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यामीक शिक्षकांची सुरक्षाही महत्वाची आहे,त्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यापूर्वी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा व आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध करून द्यावे व विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे. शिक्षकाच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही व शिक्षक पूर्ण ताकदीने बिनधास्त होऊन प्रशासनास सहकार्य करू शकतील. सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून ओळखपत्र द्यावे,पोलीस प्रशासनाकडून आपण रितसर लेखी परवानगी प्राप्त करून घ्यावी.जेनेकरुन शिक्षकांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागणार नाही.दि.23 एप्रिल रोजी COVID-19 च्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या शिरपूर तालुक्यातील तीन प्राथमिक शिक्षकांना पोलीसांनी मारहाण केली व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
आम्हाला आरोग्यविषयक साहित्य,सर्व शिक्षकांना 50 लाखांचे विमा संरक्षण द्यावे.
आम्ही या लढाईत आम्ही सर्व देशासोबत आहोत.
असे निवेदन शिक्षक भारतीचे नारायण वाघ,सोमनाथ पाटील,शीतल जडे,आर जे पाटील,विजय सोनवाणे,चंद्रकांत देशमुख,दिलिप तेली,दिपक आर्डे,आर के पाटील,सागर सोमवंशी,संजय वानखेडे अजयकुमार पाटील, प्रभात तडवी ,पंकज गरुड,रणजित पाटील,संदिप पाटील यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.