Halloween party ideas 2015


*तुषार जाधव यांच्या प्रयत्नांना यश*
*कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मार्ग मोकळा*
धुळे:- कोटा ( राजस्थान) येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मूळगावी परत आणण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी अशी मागणी ईमेल द्वारे महाराष्ट्र राज्य समाजकार्य समन्वय समितीचे अध्यक्ष तुषार जाधव यांनी राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.
या पत्रांची दखल घेत दि.२४ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत राजस्थान मधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधां वर चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाराष्ट्र परत आणण्यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्रित पणे पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन चे संचालक अभय यावलकर यांनी सरकारी पत्राद्वारे मध्येप्रदेश व गुजरात च्या अधिकार्यांना याबाबत विनंती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत महाराष्ट्र येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात दाखल होतील त्यासाठी आता युध्दपातळीवर ती काम सुरू आहे
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर व फोन द्वारे महाराष्ट्र राज्य समाजकार्य समन्वय समितीचे अध्यक्ष तुषार जाधव यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.