*श्रीगोंदा येथे पत्रकारावर हल्ला*,
*जिवे मारण्याचा धमकी*
*पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल*
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील दैनिक सार्वमतचे प़तिनिधी शिवाजी गणपत साळुंके यांना आज शिविगाळ, धक्काबुक्की करून काही हितसंबंधियांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे.. २7 एप्रिल रोजी औटेवाडी येथे ही घटना घडली.. विशेष म्हणजे या गुन्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.. नगर जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्याखाली प़थमच गुन्हा नोंदविला गेला आहे..
कुकडी कॅनॅालला भगदाड पडल्याने हे पाणी ओोढयात वाहून जात होते. साळुंखे त्याचे फोटो काढत असताना त्यांना काही लोकांनी धक्काबुक्की केली.. याची तक्रार श्रीगोंदा पोलिसात दाखल करण्यात आली असून पाच व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि संस्था अधिनियम 2017 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे...
शिवाजी साळुंखे यांना धक्काबुक्की झाल्याचे समजताच मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव, आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे नगर जिल्हा निमंत्रक मनसूरभाई यांनी कायद्याची प्रत पोलिसांना पाठवून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जावा यासाठी प्रयत्न केले.. असा काही कायदा आहे हेच अनेकांना माहिती नव्हते.. मात्र त्यांनी कागदपत्रे उपलब्ध करून देत या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा यासाठी प़यत्न केले अखेर त्यात ते यशस्वी झाले..
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत प़त्येकी पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा तालुका संघांनी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
गेल्या 35 दिवसात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची ही 19 वी घटना आहे..