Halloween party ideas 2015

*ओरिसा सरकारचा पत्रकारांसाठी मोठा निर्णय*

कोरोनाचं रिपोर्टिंग करताना एखादा पत्रकार बाधित झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर अशा श्रमिक पत्रकाराच्या कुटुंबियांना 15 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची महत्वाची घोषणा ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे.. पत्रकारांची अशा पध्दतीनं "काळजी" घेणारं ओरिसा हे पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.. ओरिसा सरकारच्या प़सिध्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे..
पत्रकारांसाठी कोरोना काळात आरोग्य विमा योजना सुरू करावी अशी मागणी देखील आता पुढे येत असून तसे साकडे केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प़काश जावडेकर यांना घातले जात आहे..
नवीन पटनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेचे मराठी पत्रकार परिषद स्वागत करीत असून त्यांना धन्यवाद देत आहे..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.