ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका व आशासेविका यांनी टाकली धाड
एरडोंल प्रतिनिधी
तळई गावात भिल्ल वस्तीत गावाचे सरपंच प्रकाश महाजन,पोलीस पाटील महेश पाटील,उपसरपंच शिवाजी पाटील,अंगणवाडी सेविका,आशा सेविका, व होमगार्ड यांनी सगळ्यांनी मिळून गावातील भिल्ल वस्तीत गावठी दारू विक्री करणार्यांवर धाड टाकली व दारू जप्त करून ती फेकण्यात आली.
यामूळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण लाभले.व ग्रामस्थांनी या सर्व धाडशी निर्णय घेणाऱ्या समितीचे कौतुक केले.गावातील बऱ्याच व्यक्तींचं म्हणणे होते की गावात दारू बंदी झाली पाहिजे म्हणून या समितीने आज धाडशी निर्णय घेऊन दारू जप्त केली.समितीला सहकार्य म्हणून गावातील अनिलभाऊ कंखरे, नाना भाऊ पाटील या दोघ व्यक्तींनी या समितीला सहकार्य केले
