जन सेवा हिच ईश्वर सेवा -
रेव्ह. :-हुराजी गावीत.
नवापूर ;-ता २५ हेमंत पाटील
नवापुर तालुक्यातील आंबाफळी धुळीपाडा येथील " इंडियन नॅशनल फूलगोस्पल चर्च आंबाफळी ता.नवापुर जि.नंदुरबार व जीवनधारा युथ गृप -आंबाफळी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील धनराट ( लांगीफळी) व चौकी ( जत्रा फळी) येथील हातमजुरी च्या बळावर उदरनिर्वाह करत असलेल्या कोटवाल ( टोपल्या विनणारे) कुटुंबियांना केंद्र सरकार व राज्य सरकारने पुकारलेल्या लाॅकडाऊन मूळे रोजगाराच्या अभावी जीवनावश्यक वस्तूची पूर्तता होत नाही. त्यामुळे जवळपास 65 ते 70. कुटुंबियांचे जीवन धोक्यात आलेले आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन येथील चर्च कमिटीने " जन सेवा हिच ईश्वर सेवा " या उक्ती प्रमाणे तांदूळ , भाजीपाला व गोडतेल या जीवनावश्यक वस्तू देऊन अदृश्य परमेश्वराची सेवा केली आहे.
यावेळी धनराट गावाचे पोलिस पाटील ईश्वर गावीत. आणि ग्रामपंचायत चौकीचे सरपंच सुनिल गावीत. व त्यांचे सहकारी प्रताप गावीत. यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन सोशीयल डिस्टंन्सीगच्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तू देण्यात मदत केली.
चर्च कमिटीला प्रा.जयराम गावीत -बोरपाडा व शमुवेल गावीत- नवापाडा यांचे मार्गदर्शन लाभले व सामजी गावीत,लाजरस गावीत, शिमोन गावीत,शिलेश गावीत आणि शरद गावीत. यांनी परिश्रम घेतले. परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून या सर्वांचे कौतुक केले जात आहे.
