साजिद शेख
धुळे :- एकत्रित कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रमजान निर्गमित महिन्यात मशिदीमध्ये नियमित नमाज करण्यासाठी पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान त्यामुळे मुस्लिम बांधवांनी घरातच रमजान नियमित नमाज पठन तरावीह व इफ्तार आदी धार्मिक कार्य पार पाडावेत, असे आदेश शासनाने नुकतेच काढले आहेत. या आदेशाचे तंतोतंत पालन करा असे आवाहन राजे भगिरथ बहुउ्देशीय संस्थेचे सचिव साजिद शेख यांनी केले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. यासाठी शासनामार्फत मोठी विविध प्रतिबंधात्मक उपयोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १४ मार्च पासून साथरोग अधिनियम लागू करण्यात आले. लवकरच मुस्लिम बांधवांना रमजान महिना सुरू होत आहे. रमजान महिण्यात मुस्लिम समाजात मोठ्या संख्येने मशिदीत जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्य: स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यांमुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्देश जारी केले आहेत. तर सरकारच्या सूचनांचे पालन करण्यासाठी धर्मगुरू, समाजिई कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी. असे आवाहन शेख यांनी केले आहे.
