दोन्ही राज्यातील अधिकारी सीमेवर..!
सीमेवरती आज महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अधिकार्याची पाहणी..झाली चर्चा..सोबत वैद्यकीय पथक कार्यरत..!
दोन्ही राज्यातील पोलीस अधिकारीची झाली भेट..!
नवापूर ;-ता २२
नंदुरबार जिल्हात कोरोणाचा रुग्ण आढळल्याने एक ही कोरोणाग्रस्त रुग्ण नसलेल्या नवापूरचा प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अधिकारी अलर्ट होऊन एकमेकांना सहकार्य करत काम करतांना दिसुन येत आहे.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने सीमावर्ती भागात कश्या पद्धतीने बंदोबस्त सुरू आहे, किती ठिकाणी बोर्डर सील केली आहे,लाॅकडाऊनमध्ये दळणवळणाची काय परिस्थिती आहे यांची पाहणी करण्यासाठी गुजरात राज्यातील तापी जिल्हा पोलिस अधीक्षक नरेंद्र चौधरी नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गावानजीक भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्यातील पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत तहसीलदार उल्हास देवरे गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र नजन, महाराष्ट्र आरोग्य टीम, गुजरात उच्छल पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निखिल भोया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास गावित आदी उपस्थित होते.सोबत वैद्यकीय पथक कार्यरत होते
गुजरात व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीमावर्ती भागातील गावांची पाहणी केली.नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग महामार्गावरील पेट्रोलिंग कश्या पद्धतीने सुरू आहे यासंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दोन्ही राज्यातील पोलीस यांची विशेष भेट झाली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण सात रुग्ण झाले आहेत. तापी जिल्ह्यात देखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहे.त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील पोलिस विभागाचे अधिकारी ने संयुक्त भेट करून सीमा सिलिंग संदर्भात उपाययोजना केलेल्या आहेत.
कोणीही गुजरात राज्यात जाणार नाही गुजरात राज्यातून एकही व्यक्ती महाराष्ट्रात येणार नाही.प्रत्येक व्यक्तिची आरोग्य तपासणी केली जात आहे. तब्येत खराब असले तर औषधे देखील दिले जात आहे.सर्वांनी घरात राहावे सोशल डिस्टन्सचे पालन करावे मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये घरातच रहा अनावश्यक प्रवास टाळा अशा पद्धतीने दोन्ही पोलीस दलाचे आरोग्य विभागाचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत.कोरोणा रुग्णात अजुन तीनची भर पडल्याने जिल्हात कोरोणा रुग्णांची संख्या ७ झाल्याने चिंतेत अधिकच भर पडली असुन लोकांनी घरातच रहावे घाबरु नये असे आवाहन करण्यात येत आहे.
