Halloween party ideas 2015

शहादा येथे पुन्हा कोरोणा पोझिटिव्ह..!
कोरोणाग्रस्तांची संख्या झाली आता ८.
नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी..!

नवापूर ;-ता हेमंत पाटील
नंदुरबार जिल्हात एक -एक करुन कोरोणा रुग्णाची संख्या वाढत अाहे.शहादा येथे आज पुन्हा एक कोरोणा पोझीटिव्ह रुग्ण आढळुन आला आहे.त्यामुळे रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे.
शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड-१९चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक त्याच प्रतिबंधीत क्षेत्रातील असून कोविड -१९ च्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या युवकाच्या संपर्कात आला होता-अशी माहीती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.

शहादा येथे दोन दिवसा पुर्वी २ कोरोणा पोझीटिव्ह रुग्ण आढळुन आले होते.त्यापैकी एकाचा परवा रात्री मुत्यु झाला.त्यानंतर आज शहादा येथील २३ वर्षीय युवकाची कोवीड-१९ चाचणीचा अहवाल पोझीटिव्ह आला आहे.
नंदुरबार जिल्हा कोरोणाग्रस्तांची संख्या ८ झाली असुन त्यातील एकाचा मुत्यु झाला आहे.नंदुरबारात ४ ,शहादा ३,तर अक्कलकुवा येथे १ रुग्ण कोरोणा पोझीटिव्ह आढळुन आले आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.