Halloween party ideas 2015

🙏पोलीस पाटील 🙏
*******************
पोलीस पाटीलच दुख ते खर
पाटीललाच माहित असत
गाव परिसराला तर त्याच
काहीच सोयरसुतक नसत!1!
गावांसाठी सदा तळमळ ती
काळजालाही घाव घालतो
तीळ तीळ तुटत काळीज
प्रत्येक त्याच्यावर वार करतो!2!
नांदावी गावात सुख शांतता
ग्रामदैवताला साकड घालतो
त्याची शांतता भंगवण्यासाठी
समाज कंटक चाल चालतो!3!
रात्रंदिवस असतो एकच ध्यास
होईल कसा गावाचा विकास
पंचांना घेऊन सोबत पाटील
राबे तंटामुक्ती अभियान खास!4!
वरिष्ठांचीही मर्जी राखतो सदा
अल्प मानधनावर काम करीतो
वसा घेतला पाटीलान मानवतेचा
सदा माणुसकी धर्म पाळीतो!5!
************************
कवि ह.भ.प. दत्ता ठाकरे वावडेकर संस्थापक अध्यक्ष युवक भारती परिवार महाराष्ट्र /पोलीस पाटील वावडे ता.अमलनेर जि.जलगाव
******************

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.