अमळनेर प्रतिनिधी
कोरोना संसर्गामुळे जळगाव जिल्हयात घोषीत झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर हातावर पोट असलेल्या सुप्रिम कॉलनी येथील गरीब कुटुंबांना तसेच गोर बंजारा समाजातील गोरगरीब कुटुंबासह इतर निर्धन कुटुंबांना गोर सेना यांच्या वतीने अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुचे वाटप करुन त्यांना दिलासा देण्यात आला. गोर सेनेच्या वतीने एकूण 56 परिवारांना सामाजीक अंतर राखून मदत वितरीत करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग.स.पतपेढ़ीचे संचालक सुभाष जाधव प्रा.हेमराज जाधव, शैलेश पवार प्रा.राठोड सर, बी.बी.धाडी सर, भारमल नाईक, मनोज जाधव ( सर ), अॅड. सागरभाऊ राठोड, गजाननभाऊ चव्हाण, चंदनभाऊ पाटील, सूरेशभाऊ जाधव, पूनमचंद वंजारी महेंद्र वंजारी अभिजित चव्हाण, गोपाल राठोड, सुरेश राठोड आदींनी बहूमोल सहकार्य केले.
लॉकडाऊनमुळे गोरगरीबांपुढे उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ग.स.पतपेढीचे संचालक सुभाष जाधव व गोर सेना यांच्यावतीने कंपनी मध्ये काम करणारे गोर बंजारा बांधव, हॉटेलमध्ये काम करणारे मजूर, तीनचाकी सायकलने मालवाहकाचे काम करणारे हमाल यांच्यासह ज्यांचे केवळ हातावर पोट आहे अशा अनेक कुटुबांना अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तु मदतीचा हात देण्यात आला. या मदतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील सुप्रिम कॉलनी या भागातील जवळपास 42 कुटुंबांसह एम. आय. डि. सी. भागात एकूण 14 कंपनीतील कामगारांच्या कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तु मा. सुभाष जाधव यांच्या हस्ते करुन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या कुटुबांना धीर दिली गोर सेना च्या मार्फत करोना आजाराविषयी जनतेत जनजागृती केली आहे. या समाजसेवी कार्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन कौतूक केले जात आहे.
