कोरोना (कोविड १९) या साथ रोगाचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी भारत सरकारने ३ मे २०२० पर्यंत संपुर्ण भारत देश लाॅकडाऊन केलेला असुन अमळनेर नगरपरिषदेचे सफाईकामगार मात्र स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालुन एखाद्या योध्दासारखा शहरातील रोगराई व घाणीच्या साम्राज्याशी दोन हात करीत आहेत. अशा लढवय्या *३७५* सफाई कामगारांना आज *दि.१४ एप्रिल २०२०* रोजी *भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतीदिनाचे अौचित्य साधुन प्रत्येकी *६५० रु.* भेट देण्याचा कौतुकास्पद निर्णय अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा *ताईसो जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील* ,मुख्याधिकारी *सौ.विद्या गायकवाड मॅडम*, उपमुख्याधिकारी *श्री.संदिप गायकवाड* व *इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने* घेतला.याकरीता नगरपरिषदेचे एकुण *२००* अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार *२ लाख २७ हजार रुपये* व नगराध्यक्षा *जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील* यांनी पुर्ण एक महिन्याचे मानधन *२०,००० रु.* अशी एकुण *२ लाख ४७ हजार रु.* दिलेत...
सदर भेट वाटप उपक्रमाची प्रातिनिधीक स्वरुपात सुरुवात *_महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात_* *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या साक्षीने *मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील*, दलित नेते *आण्णासो रामभाऊ संदानशिव*, नगरसेवक *भाऊसो नरेंद्र संदानशिव*, *शेखा हाजी मिस्तरी* *सोमचंद संदानशिव* , *जगदिश ठाकरे*, *गोल्डी भाऊ* व काही समाजबांधवांनी सामाजिक अंतर राखत केले...
सदर उपक्रमाचे व नगराध्यक्षा , अधिकारी व कर्मचारी बंधु व भगिनींच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत अाहे.....
