Halloween party ideas 2015


श्रीमती एस एम चोखवाला लिटल एंजल्स अकॅडमी येथे स्टडी होम उपक्रम

नवापूर ;-ता २४ हेमंत पाटील
दि नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एस एम चोखवाला लिटल अकैडमी नवापुर येथे कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारत सरकार व्दारा संपूर्ण भारतात लॉकडाउन करण्यात आले असून या दरम्यान शाळा ,महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत अश्या प्रसंगी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ सिमरन अमोल दिवटे यांच्या यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने शाळेने स्टडिफॉम होम उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम डिजाटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन व्दारे पुर्ण करण्यात येत आहे .

सदरील उपक्रमा बाबत पालकांमध्ये समाधानाचे सुर उमटत आहेत तर विद्यार्थ्यांच्या देखील भरपूर प्रतिसाद ह्या उपक्रास मिळत आहेत.पालक वर्गाने उपक्रमाचे भरपूर कौतुक करत शाळेचे व्यवस्थापक मंडळ मुख्याध्यापिका यांचे आभार मानले.

तसेच अभ्यासक्रमास शिवाय विद्यार्थ्यांना वेळोवेळी विषय शिक्षकांकडून कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सूचना करण्यात येत आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.