Halloween party ideas 2015


ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूचं अजब लग्न गजब खेळ !
सद्यस्थितीत कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर दहशत पसरवली आहे. संपूर्ण जग अक्षरशः जागेवर थांबले आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगातील प्रत्येक व्यवहार बंद आहेत. अनेक देशांनी आपापल्या नागरीकांना कोरोनाच्या जंजाळापासून वाचण्यासाठी घरातच थांबण्याचे फर्मान काढले आहे. अशात सर्व प्रकारचे क्रिडा प्रकारही बंद आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारने तर सहा महिने आपल्या देशातील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे खेळाडूही आपापल्या घरात बंदिस्त आहेत. त्यातील बरेचसे घरातच व्यायाम, प्रॅक्टीस व खेळाचा अभ्यास करत आहे.
या क्वारंटाईनच्या काळात ऑस्ट्रेलियाची अव्वल दर्जाची महिला जलदगती गोलंदाज मॅगन शट हिने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस सोमवारी ३० मार्चला साजरा केला. मॅगनच्या लग्नाची कहाणी ऐकल्या नंतर आपल्याही पायाखालची जमीन हलेल. ३o मार्च २०१९ रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी तिने विवाह केला. पण तो मात्र कुणा पुरुषाशी नाही तर एका महिलेशी !म्हणजे समलिंगी विवाह !!
हो बरोबर आहे मागच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या देशात समलिंगी विवाह कायदा संमत केला आणि त्याची अंमलबजावणी करणारी पहिली क्रिकेटपटू ठरली मॅगन शट. आपली समलैंगिक पार्टनर जेस होलियाक सोबत तिने आपला अजब संसार थाटला.
ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड कडून खेळणारी जलदगती महिला गोलंदाज मॅगन शट नुकत्याच ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या महिलांच्या टि२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाची निव्वळ सदस्यच नव्हती, तर अंतिम फेरीत भारताला हरवून ऑस्ट्रेलियाला विक्रमी विजेतेपद मिळवून देण्यात अग्रेसर होती. स्पर्धेत सर्वाधिक १३ बळी मिळवून तिने स्वतःचे अस्तित्वही क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे.
इतकेच नाही तर मॅगनच्या नावावर सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन हॅट्रीक घेण्याचा विश्वविक्रमही आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडूही बनली.
मार्च २०१९ मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारताविरूध्द टि२o सामन्यात मॅगनने हॅट्रीक करून भारतीय संघाची दाणादाण उडविली होती. त्या सामन्यात २६ वर्षीय मॅगनने सलीमीवीर स्मृती मंधाना, कर्णधार मिताली राज, व दिप्ती शर्मा यांना सलग तिन चेंडूवर डग आऊटमध्ये धाडून स्वतःची पहिली हॅट्रीक साधली होती.
विश्वचषकापूर्वी झालेल्या विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवशीय सामन्यात विडींजच्या डावाच्या शेवटच्या तीन चेंडूवर चिनेल हेन्री (३९ धावा ), करिश्मा रामहरक शुन्य व एफी फ्लेचर ( तीन धावा ) यांना सलग बाद करून आपली दुसरी हॅट्रीक साधली.
मॅगन शट हि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महत्वाची घटक असून आपल्या खेळाने ती संघाला मदत करत असून स्वतःच्या वैयक्तीक जीवनात कायद्याने समलिंगी विवाह करून आपल्या सहचारीणीसह आनंदाने जीवन जगत आहे. तिच्या भावी वाटचालीस आपणही शुभेच्छांचा वर्षाव करून तिच्या क्रिकेटमधील जोरदार कामगिरी बद्दल अभिनंदन करूया !

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email: dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.