Halloween party ideas 2015


*महिलांनी संघटित होऊन सामाजिक कार्यासाठी घराबाहेर पडण्याचा मान्यवरांचा सूर*
*सावित्रीमाई फुले महिला मंडळा तर्फे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*

अमळनेर येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेच्या मंगल कार्यालयात सावित्रीमाई फुले महिला मंडळा तर्फे वार्षिक महिला स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी नगरसेविका न.पा. च्या नवनिर्वाचित महिला बालकल्याण उपसभापती सौ.ज्योती धनंजय महाजन या होत्या.
सर्वप्रथम फुले दाम्पत्य यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले तसेच सौ.ज्योती दिपक महाजन कु.सानिका प्रमोद महाजन यांनी गीत गायन करून मान्यवरांचे स्वागत केले यावेळी उपस्थित सर्व महिलांना सावित्रीबाई फुले यांचे पुस्तिका व सेनेटरी आणि गंगाळेचे मोफत वाटप करण्यात आले सावित्रीमाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाबाई प्रभाकर महाजन यांनी समाजातील महिलांनी संघटित होऊन समाजाच्या हितासाठी घरा बाहेर पडून सामाजिक कार्यात सर्वाधिक सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी महिलांना आपले भाषणातून केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.ज्योत्सना प्रमोद महाजन यांनी केले तर प्रमुख मान्यवर म्हणून महिला मंडळ अध्यक्षा मिनाबाई प्रभाकर महाजन,सुरेखा दिलीप पाटील सुवर्णकार समाजाच्या महिला मंडळ च्या उपाध्यक्षा सौ.पूनम भामरे पार्वताबाई चौधरी या होत्या.यावेळी मंडळाच्या सचिव मोहिनी उदय खैरनार,सहसचिव कविता भाऊसाहेब महाजन,कल्पना भास्कर महाजन,कोमल महाजन,ललिता महेश माळी,अनिता प्रदीप पाटील,अनिता प्रविण महाजन,ज्योती महाजन,हर्षदा पाटील,निलिमा पाटील महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महिला सक्षमीकरण साठी पार्वताबाई चौधरी,पूनम भामरे यांनी मनोगत वेक्त्त केले.समाजासाठी संघटित होऊन महिलांनी सक्षम व्हा एकत्रित व्हा हाच सूर महिलांनी संदेशा मार्फत दिला.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर समाजातील महिला भगिनी,युवती,उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सावित्रीमाई फुले महिला मंडळ च्या सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.कोमल भास्कर महाजन यांनी तर आभार सौ.कविता भाऊसाहेब महाजन यांनी केले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.