मुलांना परिस्थितीची जाणीव होऊ दया-
प्रा जयदीप पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पालकांनो आपण आपल्या मुलांना सगळे शिकवतो,पण काम शिकवत नाही. आज मुलांशी संवाद साधणे कालबाह्य झाले आहे. आज मुलगा आईवडिलांचे ऐकत नाही.संस्काराची मुल्यांची उंची मोठी ठेवा.मुलावर विश्वास टाका.त्याचे कोणतेही चुकीचे काम लपवणार नाही,त्यासाठी त्याच्यावर विश्वास टाकायला शिका.
आई वडीलांचे नात्यामध्ये सध्या कटुता आहे.अगोदर शिक्षकावर विश्वास होता तो आता राहीला नाही. याला कोण जबाबदार याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.आजची तरूणाई विध्वंसकाकडे वळली आहे.सगळयात जास्त आत्महत्या तरुणगटातील आहेत.सोशलमिडीयामुळे तरूणपिढी आपला अमूल्य वेळ वाया घालीत आहे.म्हणून मुलांना आपल्या परिस्थीतीची जाणीव होऊ दया.असे अमळनेर येथे जी.एस.हायस्कूल आय.एम.ए.हाँलमध्ये सानेगुरुजी विचार मंच व शिवशाही फाऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विदयामानाने आयोजित व्याख्यानमालेत प्रा.जयदीप पाटील मुलांचे शिल्पकार आई बाबा आणि गुरूजी या विषयावर बोलत होते.
. ते पुढे म्हणाले कि
समाजातील वाईट गोष्टींनां आवार घालण्याचे काम शिक्षकच करू शकतो.आई वडील मुलाला जमीनीवर चालविण्याचे शिकवतात, तर शिक्षक त्याला समाजात आत्मविश्वासाने जगायला शिकवतात. म्हणून मुलांचे आजचे शिल्पकार आई बाबा इतकेच शिक्षक आहेत.कारण ते विष्णू, ब्रम्ह, महेश प्रमाणेच आहे.विदयार्थीनो आपले स्वप्न मोठे असावे.आपल्या देशात १३१करोड लोक राहतात गेल्या शंभर वर्षात बोटावर मोजण्याइतपत भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मात्र पाश्चात्य देशातील लोक या शर्यतीत आपल्यापेक्षा कितीतरी पट पुढे आहेत. शिक्षणाचा उपयोग पोटाची खळगी भरण्यासाठी न करता ज्या शिक्षणातून समाजाचा सर्वागीण विकास होईल असे शिक्षण घेऊन संशोधन कार्यात स्वतःला गुंतवून घ्या.आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे तेच क्षेत्र तुम्हाला सर्वाच्च शिखरापर्यंत नेऊ शकते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष निरज अग्रवाल(कार्याध्यक्ष-खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर) प्रमुख अतिथी जयेशकुमार काटे(अध्यक्ष शिवशाही फाऊंडेशन अमळनेर) होते.पाहुण्याचा परीचय विजयसिंग पवार यांनी केले तर प्रस्ताविक शरद पाटील यांनी केले.अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत पाटील(शिरूड) संजयपाटील( पाटील(मंगरूळ)
प्रविण पाटील(पिंगळवाडे),नारायण चौधरी(निंभोरा)मनिषा चौधरी ज्ञानेश्वरमोरे,रेखा पाटील व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी तिन दिवसीय व्याख्यानमालेस सहकार्य करणाऱ्याचे आभार मानले.तर अध्यक्षीय भाषणातून निरज अग्रवाल यांनी सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंचाच्या उपक्रमांचे अभिनंदन केले. अशा व्याख्यानमालेची सध्या गरज आहे. पुढे आपण कोणताही उपक्रम राबवला माझे आपणास पुर्ण सहकार्य राहिल असे सांगून पुढच्या वेळेस इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पालकासाठी उदधबोधनपर उपक्रम राबवावा अशी आयोजकांना विनंती केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले. यावेळी प्रताप काँलेजचे उपप्रचार्य प्रा.एस.ओ.माळी, ग.स.संचालीका सौ विदयादेवी कदम, गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे,सरपंच नरेंद्र पाटील, अशोक पाटील, दत्तात्रय सोनवणे, उमेश काटे, संजय सुर्यवंशी, प्रा.पि.के.पाटील, डि.ए.धनगर, मनोहर नेरकर, रामकृष्ण बाविस्कर उपस्थित होते.शेवटी आभार प्रर्दशन प्रेमराज पवार यांनी केले.व्याख्यानमालेला शिक्षक बंधू भगिनी, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
अमळनेर येथे जी.एस.हायस्कुलमध्ये आय.एम.ए.हाँलमध्ये व्याख्यानमालेत बोलतांना प्रा.जयदीप पाटील. सोबत निरज अग्रवाल, जयेशकुमार काटे.
छाया ईश्वर महाजन अमळनेर