Halloween party ideas 2015

स्वताला ओळखल्याशिवाय यशस्वी जीवनाचा मार्ग सापडणार नाही-

तहसीलदार सुदाम महाजन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)   करियर निवडताना खूप घालमेल होते त्यासाठी डोळ्यासमोर मोठा उंच स्तराचा आदर्श ठेवा   आणि स्वतःला ओळखा स्वतःला तुम्ही सापडले की तुम्हला तुमचा जीवनाचा  रस्ता सापडेल असे  प्रतिपादन शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी केले 

सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने  जि एस हायस्कूल मध्ये आय एम ए सभागृहात आयोजित प्रेरणदिप व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना   करियर च्या वाटा निवडताना या विषयावर ते बोलत होते 

सुदाम महाजन पुढे म्हणाले की मानसशास्त्र असे म्हणते की एखाद्या विषयात तज्ञ व्हायचे असेल तर 10 हजार तास त्या विषयाचा अभ्यास करा  जगातील 54 टक्के लोक नोकऱ्या करतात यश  कमावण्याचे चारच मार्ग आहेत पहिला नोकरी , आणि नोकरीत सर्जनशीलता नसेल तर ती कामाची नाही , दुसरा मार्ग म्हणजे स्वकमाई ,तिसरा उद्योजक जगातील 3 टक्के लोक उद्योजक आहेत 

मोठे व्हायचे असेल तर तुमच्या इच्छेविरुद्ध शिकवल्या जाणाऱ्या शाळेत जाऊ नका असे विचारवंतांनी म्हटल्याचे ते म्हणाले कारण सध्या च्या शाळांमध्ये स्व चा विसर पाडला जातो आपण जेव्हा हरतो तेव्हा आपण आपले क्षेत्र निवडतो तसे न करता आधीच ध्येय निश्चित करा चौथे क्षेत्र म्हणजे गुंतवणूक  प्रत्येक पालकाने मुलाचे करियर निवडणूयासाठी मुलांसाठी गुंतवणूक करावी असे आवाहन ही त्यांनी केले 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग स हायस्कूल चे चेअरमन प्रदीप अग्रवाल  होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा संदीप पाटील(मंगरूळ), माजी आमदार साहेबराव पाटील ,  गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, ग स बँक संचालिका विद्यादेवी कदम हजर होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व पू सानेगुरुजीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले

 

प्रा संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास   उपप्राचार्य एस  ओ माळी ,प्रा डी डी पाटील , सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच चे मनोहर नेरकर , उमेश काटे , दत्तात्रय सोनवणे, चंद्रकांत पाटील , अशोक पाटील , जयेश काटे , रामकृष्ण बाविस्कर प्रेमराज पवार, हिरालाल पाटील,विलास पाटील,  शरद पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र पाटील, गोकुळ पाटील, भरत कदम ,नरेंद्र पाटील , किरण पाटील , प्रा पी के पाटील  हजर होते

   तहसीलदार सुदाम महाजन यांचा परिचय रामकृष्ण बाविस्कर  यांनी करून दिला  प्रास्ताविक डी ए धनगर यांनी , सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले

फोटो

अमळनेरला जी.एस.हायस्कुलच्या सभागृहात व्याख्यानमालेत तहसीलदार सुदाम महाजन करीयर निवडतांना या विषयावर बोलतांना. व मान्यवर

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.