*बांबु उडी राज्यसतरीय स्पर्धेत प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळवणार्या कळमसरे चा सुपुत्र गणेश व्हलर याचा आ शिरिषदादा चौधरींच्या हस्ते सत्कार*
*सर्वतोपरी मदतीचे आश्वासन*
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
राज्यस्तरीय बांबु उडी स्पर्धेत प्रताप महाविद्यालय च्या वतीने खेळणारा कळमसरे येथील आदिवासी कुटुंबातील गणेश रामदास व्हलर याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली.
त्याच्या या यशाने कळमसरे गावासोबतच तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असे मत आ चौधरी यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
दोनवर्षापूर्वी गणेश हा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल आ शिरिषदादा यांनी कळमसरे येथील एका सामाजिक कार्यक्रमात त्याच्या कलागुणांचे सत्कार करुन कौतुक केले होते.
सत्कार प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे प्रा नामदेव सर, प्रा सुकदेव सर, जाधव सर , क्रिडा शिक्षक अग्रवाल सर, नगरसेवक प्रवीण पाठक, नरेंद्र चौधरी, अनिल महाजन, मा सरपंच राजेंद्र पा,तसेच सुरेंद्र पाटील, हेमंत चौधरी, गुलाब आगले, जयेश चौधरी, राजेश महाजन, मयूर चौधरी व युवा वर्ग मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.