Halloween party ideas 2015

राज्यस्तरावर नावलौकिक करणा-या गणेश व्हलरलाच्या परीवारास सर्वातोपरी मदत करू-
आ.स्मिताताई वाघ
कळमसरे येथे विविध क्षेत्रांत नावलौकीक करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी-गावाचे व तालुक्याचे नावलौकिक करायचे असेल तर मनात जिद्द आत्मविश्वास असला पाहिजे,परीस्थीतीवर माणूस मात करूण यश प्राप्त करु शकतो हे गणेश व्हलर या विदयार्थीने दाखवून दिले आहे. गणेशला भविष्यात कोणतीही मदत लागली त्यासाठी आम्ही सर्वातोपरी प्रयत्न करु असे कळमसरे येथे जाहिर सत्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी आमदार स्मिताताई वाघ बोलत होत्या.
     व्यासपीठावर माजी जिल्हा परीषद सदस्य व्हि.आर.पाटील, पंचायत सदस्य. प्रफुल्ल पाटील, कार्यक्रमाचे आयोजक उपसरपंच मुरलीधर महाजन,सरपंच कल्पना पवार, निमचे सरपंच भास्कर चौधरी, शत्रुगन पाटील होते.
     आज कळमसरे गावात विविध क्षेत्रात नावलौकिक करुन एक चांगला आदर्श तरूणपिढीसाठी ठेवला असून शिक्षण,क्रीडा, शेती,समाजसेवा या क्षेत्रातील विशेष गुण संपादन करणाऱ्याचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रम मी आयोजन केला मला मनापासून आनंद झाला. त्यांच्या भावीवाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा असे कार्यक्रमाचे आयोजक उपसरपंच मुरलीधर महाजन यांनी सांगितले.
       आज कळमसरे येथे गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला.
कळमसरे येथील 
1.अत्यंत गरीब परिस्थितीतून मार्ग काढून गावाचे नाव राज्यस्तरावर चमकवनारा(गोल्ड मेडिलिस्ट) चि. गणेश व्हलर 
2. हिंदी विषयात P. Hd. ची पदवी प्राप्त करणारे प्रा. डॉ.संजय महाजन
3. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त यश महाजन( ज्याने आपल्या जि. प. शाळेला रेल्वे चे रूप दिले)
4. गावातील गरजू रुग्णांची मदत करणारा शिवाजी राजपूत
5. आणि गावातील आदर्श शेतकरी प्रेमसिंगभाऊ राजपूत
या सर्वांचा यावेळी विधान परिषद आमदार ताइसो. स्मिता वाघ, माजी जि प सदस्य व्ही. आर. आप्पा, प स सदस्य प्रफुल्ल बापू, निम चे सरपंच भास्कर चौधरी, पाडळसरे येथील शत्रुघ्न पाटिल या मान्यवारांच्या हस्ते
शाल,श्रीफळ देऊन
 सत्कार करण्यात आला.
यावेळी ताई साहेबांनी चि. गणेश यास यापुढिल लागणारी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच सौ. कल्पनाताई पवार, ग्राम पंचायत सदस्य अशोक महाजन, सौ. छायाताई मिस्तरी, सौ. यशोदाबाई निकम हे उपस्थित होते. यावेळी गावातील गावकार्यांनी खुप गर्दी केली होती. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आपले लाडके उपसरपंच मुरलीधर भाऊ, (भा ज पा ओबीसी मोर्चा चे जळगाव जिल्हा सरचिटणीस) यांनी केले होते.
म्हणून सर्व सत्कारार्थीनी भाऊंचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवेंद्र महाजन यांनी तर आभार प्रा.हिरालाल पाटील यांनी मानले.
फोटो
कळमसरे येथे उपक्रमशील शिक्षक यशवंत महाजन याचा सहपत्निक सत्कार करतांना आमदार स्मिताताई वाघ,उपसरपंच मुरलीधर महाजन,व्हि.आर.पाटील, सरपंच कल्पना पवार व मान्यशर
छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.