शिक्षकामध्ये एकच चर्चा, शिक्षकांचा आमदार शिक्षकच.
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)-शिक्षक आमदारकीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून
उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची दिनांक ७ जुन,व नामनिर्देशन पत्राची छाननी ८ जुन तर माघार घेण्याची दिनांक ११ जुन ,मतदान दिनांक २५ जुन २०१८ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव शांताराम पाटील यांचा जळगांव जिल्हा दौरयामध्ये तालुक्यातील प्रत्येक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक,समाजसेवक, मित्रपरीवारांशी निवडणूक संदर्भात हितगुज केली.
अमळनेरला कांग्रेसच्या प्रदेश सचीव अँड ललिता पाटील,मुख्याध्यापक संघाचे माजीअध्यक्ष प्रकाश पाटील,पत्रकार संजय पाटील, माजीनगरसेवक बाळासाहेब महाजन,समतापरीषदेचे दिनेशबापू माळी,महीलाध्यक्षा वसुंधरा दशरथ लांडगे, ओबीसी शिक्षक परीषदेचे शहराध्यक्ष डि.ए.सोनवणे, जिल्हासदस्य एन.आर.चौधरी, प्रभाकर विंचुरकर, नरेश साळुंखे, विवेक बोरसे ,मुख्याध्यापक रणजीत शिंदे, दशरथ लांडगे, सोपान भवरे,मुनाफ तळवी,भाऊसाहेब जी टी.टाक,मुख्याध्यापक अनिल चौधरी,बी.एच चौधरी, प्रेमादादा महाजन,सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष प्रा आर.बी.पवार, गणेश माळी,प्रा.जयश्री साळुंखे मँडम,प्रदीप चौधरी,डी.डी.राजपुत,मुंदडा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मुंदडा, हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष दिपक पवार, मनीष उघडे ,अशा अनेक अमळनेर तालुक्यातील शिक्षक,समाजसेवक, संस्थाचालकांशी प्रत्यक्ष तर काहीशी फोनवरून संपर्क केला.
धरणगांव येथे शिक्षक बी.आर.महाजन,ए.के.पाटील, गोपाळ बाविस्कर, परमेश्वर रोकडे,विनोद माळी,महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक महाजनसर,भगीरथ माळी,माळी सर,किरण पवार,सर महाराष्ट्र माळी महासंघाचे नाशिकविभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्याशी निवडणूक संदर्भात हितगुज करुण विलासराव पाटील यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून येण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
एरडोंल येथे कांगेसचे तालुकाध्यक्ष, व महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन व पदाधिकारी, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डि.एस.पाटील सर तळ ईचे संस्थाचालक महाजन यांच्याशी शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील यांनी निवडणूक संदर्भात हितगुज केली. आमचा विलासराव पाटील यांना पाठिंबा आहे असे सांगितले.
चाळीसगांव येथे दिनेश चव्हाण, महाजन सर, कजगांव येथे आदर्श कन्या हायस्कूलचे मानद सचीव ,व जळगांव जिल्हा परीषदेचे माजीशिक्षण सभापती एकनाथ आण्णा महाजन,भडगांव येथे संस्थाचालक शशिकांत महाजन,नगरदेवळा येथे शाळेचे संस्थापक शिवाबापू महाजन,यांच्याशी शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील यांनी हितगुज करूण आमचा आपल्याला जाहीर पाठिंबा आहे असे माजी शिक्षणसभापती एकनाथ महाजन,शिवाबापू, शशिकांत महाजन यांनी सांगितले.
साकळी हायस्कूलचे संस्थापक वसंत महाजन,मुख्याध्यापक गोकुळ बोरसे व शिक्षकांशी हितगुज करून विलासराव पाटील यांना निवडणून येण्यासाठी आम्ही सर्वातोपरी प्रयत्न करू सांगितले. रावेरला सतीश वैष्णव, प्रा गोसावी, व अनेक शिक्षक बांधवाशी विलासराव पाटील यांनी चर्चा केली.
एकंदरीत जळगांव जिल्हा शिक्षक आमदारकीसाठी विलासराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.कारण डझनभर उमेदवार उभे असून त्यात विलासराव पाटील एकमेव माध्यमिक शिक्षक आहेत. पंचवीस वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत, त्यांची जन्मभूमी जळगांव जिल्हा तर कर्मभूमी धुळे जिल्हा असल्याने त्यांचा मित्र परीवारांचा गोतावळा पाचही जिल्हयात आहे,त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकरूपये न घेता खान्देशतील आतापर्यंत पाचशे शिक्षकांचा गुणगौरव केला आहे,त्यांचे प्रत्येक तालुक्यात स्टारप्रचारक आहेत.म्हणून येणाऱ्या निवडणुकीत सामान्य शिक्षकालाच म्हणजे विलासराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कितीही पैशाचे आमीष आले याला शिक्षक बळी पडणार नाहीत हे निश्चित. कारण तशी चर्चा सुरू आहे.
जळगांव जिल्हा दौऱ्यावर शिक्षक आमदारकीचे उमेदवार विलासराव पाटील यांच्या बरोबर मुख्याध्यापक अनिल महाजन,ईश्वर महाजन,गणेश चव्हाण, एन.जी.देशमुख व मित्र परीवार होते