अमळनेर प्रतिनिधी
येथील प्रताप महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सेंटरच्या बेजबाबदार अडमिशन प्रोसेस मुळे एका विद्यार्थ्याचा वर्षभराचे नुकसान झाले असून सदर विद्यार्थी हा बी.ए. च्या तृतीय वर्षाला शिकणारा आहे. गेल्या मागील वर्षाच्या ८ व्या महिन्यात लक्ष्मीकांत सोनार ने अडमिशन घेतली आणि ती प्रताप महाविद्यालय सेंटरने चेक करीत मान्य हि केले, पुढे मुक्त विद्यापीठातर्फे दिली जाणारी पुस्तके मिळाली, घरी अभ्यासक्रमाच्या वह्या सुद्धा मिळाल्या आणि त्या भरून अमळनेर प्रताप महाविद्यालयाच्या मुक्तविद्यापीठाच्या केंद्रात स्वाक्षरी समवेत जमा हि करून घेतल्या मात्र ऐन परीक्षाच्या वेळेस जेव्हा हॉलतिकीट घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र ऑनलाइन आणि ऑफलाईन कुठल्याच पद्धतीने हॉलतिकीट तुला भेटणार नाही आता पुढील वर्षी तुला प्रवेश घ्यावा लागेल असे मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक पी. पाटील यांनी सांगितले. वेगवेगळे कारण दाखवत लक्ष्मीकांत ला असे सांगण्यात आले. त्याची परीक्षा येत्या ३१ मे पासून सुरु होत होती आणि या ऐन कारभारामुळे तो नाराज झाला आहे. त्याच्याकडे २३८० रुपये भरल्याची अडमिशन पावती देखील त्यांना दाखवली तसेच कर्मचारी वर्गाला दाखवली मात्र लक्ष्मीकांत चे हे वर्ष व्यर्थ गेले असे तो सांगतो. येत्या वर्षात सरकार कडून ६३ हजार जागांची रिक्त पदे हि भरली जाणार होती मात्र याला आपण अश्या गलथान कारभारामुळे मुकलो असे लक्ष्मीकांत ने सांगितले.
प्रतिक्रिया : हा असला भोंगळ कारभार असाच चालत राहिला तर माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसेल हे नक्की हे अडमिशन प्रोसेस हिच जर बेजाबदार पणाने होत राहिली म्हणून माझे 1 वर्षाचे नुकसान देखील झाले.
*लक्ष्मीकांत सोनार,* मुक्तविद्यापीठ, विद्याथी