अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर नगरपालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे नगरसेवक यांनी शहरातील ररत्यांचे काम सुरू केल्यामुळे नागरीकामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.त्यसाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास होतांना दिसत आहे.
अमळनेर नगरपरिषद, अमलनेरसाठी हतनूर धरणातून 3 ऐवजी 2 आवर्तनामुळे संभाव्य पाणी टंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी जळोद येथे तापी नदीपत्रावर 3 ट्यूबवेलसाठी नगरपरिषदेच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी , जळगांव यांनी तात्काळ मान्यता दिल्यानुसार आज मंगळवार दि. 29 मे रोजी प्रत्येक्ष सुरवात झाली असून सदर ट्यूबवेल 60 मीटर खोलीकरण झाल्यावर अमळनेर शहरात आहे त्या स्थितीतच पाणी पुरवठा सुरळित ठेवून पाणी टंचाईवर यशस्वी मात करण्यासाठी माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या पूर्वदुरदृष्टीकोनातून अमळनेर शहराला सुरळीत अनं नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे