पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकाने अमळनेर शहरात सव्वादोन लाखांचे रासी बोगस बियाणे जप्त, ४ जणांना अटक.
अमळनेर प्रतिनिधी
पोलिसांच्या कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने रात्री १२ वाजेच्या सुमारास बोगस बियाणे रविवारी सिंधी कॉलनीजवळ रात्री जप्त केले. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात बोगस बियाणे विक्रीसाठी येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार या पार्श्वभूमीवर हि कारवाई करण्यात आली
यासाठी डीवायएसपी रफीक शेख,पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, पो. कॉ. विजय साळुंखे, रवींद्र पाटील,योगेश महाजन, बापू पारधी, संतोष पाटील व कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी, मोहीम प्रमुख पी.एम.महाजन, कृषी विस्तार अधिकारी अमोल भदाणे या अधिकाऱ्यांनी एका चारचाकी वाहनासह चार संशयितांसह २ लाख २४ हजार २२० रुपयांचे ३०० पिशव्या बियाणे जप्त केले. यात दिनेश शंकर महाजन रा. अमळनेर, किशोर शामराव महाजन रा.माळीवाडा अमळनेर, नितीन रमेश चव्हाण रा पिंपळी ता.अमळनेर, संदीप मधुकर साळी रा अमळनेर या चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलिसात याबाबत भाद्वी कलम ४२०,४६३,४६५,४६८,४७१,(३४) सह महाराष्ट्र बियाणे , उत्पन्न, उत्पादक विक्रेत्याचे नाव गुणवत्तेचे उल्लंघन, तसेच विना परवाना कापूस बियाणे साठवणूक, पेकिंग विक्री अधिनियम १९६६ चे खंड ७ चे व महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा व वितरण विक्री निश्चिती अधिनियम २००९/१० चे कलम १० चे उल्लघन,तसेच जीईएसी मान्यतेचे उल्लेख नसल्याने पर्यवरण संरक्षण कायदा १९६८ चे उल्लघन अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा १९५५ चे कलम ३,९ चे उल्लंघन ७ याप्रमाणे फिर्यादी गुणवत्ता निरीक्षक अमोल प्रकाश भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असली बियाण्यात आणि या बियाण्यात असा ओळखा फरक – सापडलेल्या राशीच्या बियाणे हुबेहूब दिसत असले तरी त्यात त्रुट्या आढळून आल्या आहेत. या पिशवीवर बारकोड स्क्रश करण्याचे स्टीकर स्क्रश होत नाही त्याखाली नंबर असतो. त्याला रासी जेन चेक या एपने त्यावर येणाऱ्या असली नकली ओळखता येते. मात्र या बोगस बियाण्याचे बारकोड स्टीकर स्क्रश होत नव्हते. यासह नावात देखील फरक आढळून आला. असली कंपनीचे नाव सरळ आहे तर याचे खाली वर आहे. पिशवीच्या मागील बाजूला वापरण्याच्या सूचना मराठीत न ठेवता ते बोगस बियाणाच्या पिशवीवर इंग्रजीत छापले आहे. यासह मागील बाजूस नॉन बीटी असा एक कॉलम असून ते मूळ कंपनीच्या पिशवीवर आढळून आलेले नाही यासह वरच्या रेपरवर मूळ पिशवीवर काळा चौकोन ठळक आहे. तर बोगस पिशवीवर काळा चौकोन आयाता सारखा बारीक आहे. लोगोच्या रंगात देखील बराच फरक आहे. यासाठी शेतकर्यांनी सावधान व सतर्क राहून बियाणे ओरिजिनल आहे कि नाही याची खात्री करावी.असे आवाहन कृषी विभाग व पोलिसांनी केले आहे. त्यामुळे फसवणूक टळून उत्पादनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.