अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील रहीवाशी व शिरपुर येथे आर.सी.पटेल कला वाणीज्य व विज्ञान महाविदयालयातील गणित विषयाचे प्रा.आर.पी.महाजन हे राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा.आर.पी.महाजन हे कळमसरे येथील रहीवाशी असून अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांनी आपल्या जिद्द, आत्मविश्वास, यांच्या जोरावर शिक्षण घेऊन नामवंत काँलेजात आपल्या बुद्धीच्या जोरावर नोकरीला लागले.गणित विषयाची आवड असल्याने ते त्या विषयात ते एम.एस.सी झाले. सेट परीक्षेत ३५० पैकी २१६ गुण मिळाले. ही परीक्षा २८ जानेवारी २०१८ रोजी झाली होती.महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठाने घेतलेल्या राज्य पात्रता परीक्षेत ६२४०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४०६७ विद्यार्थी पास झाले.
त्यांच्या यशाचे अभिनंदन माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, काँलेजचे चेअरमन राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, प्राचार्य डॉ डि.आर.पाटील व कळमसरे येथील समाजबांधवानी अभिनंदन केले आहे.