अमळनेर प्रतिनिधी-
आ.चौधरी यांनी केलीली कामाचे श्रेय आ स्मिता वाघ घेतल्याचा आ.चौधरी कार्यकर्तेचा आरोप
अमळनेर( प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या आमदार सौ स्मिता वाघ यांनी माझ्या मंजूर लोकार्पण झालेल्या तालूक्यातील ग्रा. पं. ईमारतीच्या कामांची आता मंजूरी मिळाल्याचे सांगून स्वतःचे हसू करून घेतले असून लोकप्रतिनिधी किती जागृत असतात हे दाखविण्याचा खोटा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे श्रेयासाठी जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे असे आवाहन आ शिरिष चौधरी यांनी त्यांचे निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत केले त्यांनी ज्या दिवशी हे माझे ते तूझे हे थांबवून हे आपले आहे असे सांगतील त्यावेळी त्यांचा आम्ही सत्कार करू तालूक्यातील ७ ग्रा. पं. ईमारत बांधकामा साठी प्रत्येकी १२लाख रू स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून मंजूर केल्याचे सौ वाघ यांनी सांगीतले आहे त्यात सूंदरपट्टी, कळंबू,एकरूखी, खेडी प्रज, कूऱ्हे बू, अंचलवाडी व गलवाडे या ७ गावांचा समावेश असल्याचे म्हटले आहे मूळात १वर्षापूर्वीच या कामांना मंजूरी मिळून ५ गावातील ग्रा. प. ईमारतीचे बांधकाम होवून लोकार्पण ही झाले आहे मग आता पुन्हा हि कामे कूठून आणली व मंजूर केल्याचा कांगावा केला जात आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे नाव मा बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजना आहे लोकप्रतिनिधींना हेडचे नाव माहित नाही आणी मंजूर दाखविली जाते फाफोरे बंधारा असो कि भिलाली बंधारेची सूधारीत प्र मा मंजूरी असो अशी अनेक मी मंजूर केलेली कामांचे श्रेय आ सौ वाघ यांनी घेवू नये मूळात राज्यात विकास कामांवर खर्च करण्यासाठी फक्त २कोटी रूपये वर्षाला निधी मिळतो व सौ वाघ मीच कामे केली अशी शेखी मिरवितात एकदा जनता दरबार भरवून याचा सोक्षमेाक्ष लावण्यास आपण तयार असल्याचे आ शिरिष चौधरी यांनी सांगीतले बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामे देणेबाबत ऊदय वाघ यांनी आ एकनाथराव खडसे ना गिरिष महाजन व मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणविस या पक्षाच्या जेष्ट नेत्यांसमोर दिलेला शब्द त्यांनी पाळावा व पदमूक्त व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले बाजार समितीवर सत्ता स्थापनेवेळी दोन्ही गट एकत्र आले होते त्यात दोन वर्ष वाघ यांचे कडे व ३वर्ष आ शिरिष चौधरी गटाला देण्याचे ठरले होते सेना प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी पत्रकारांना सांगीतले कि वेळ आल्यास जनता जनार्धन सांगेल तो आपण निर्णय घेवू असे सांगीतले.